नव्या पिढीला प्रेरणा देणारे अस्तित्व संस्थेचे काम - पो. नि .अ" /> नव्या पिढीला प्रेरणा देणारे अस्तित्व संस्थेचे काम - पो. नि .अनंत कुलकर्णी
IMG-LOGO
Home सामाजिक नव्या पिढीला प्रेरणा देणारे अस्तित्व संस्थेचे काम - पो. नि .अनंत कुलकर्णी
सामाजिक

नव्या पिढीला प्रेरणा देणारे अस्तित्व संस्थेचे काम - पो. नि .अनंत कुलकर्णी

September 2023 161 Views 0 Comment
IMG

नव्या पिढीला प्रेरणा देणारे अस्तित्व संस्थेचे काम - पो. नि .अनंत कुलकर्णी

सांगोला (तालुका प्रतिनिधी): अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून समाजाचा शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेऊन चालू असलेले काम नव्या पिढीला प्रेरणा देणारं व आदर्श घालून देणारं असल्याचे मत सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अटलास कॉपको व सी एफ टी आय मुंबई यांच्या सहकार्याने व अस्तित्व संस्थेच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी सांगोला येथे ग्रामीण भागातील 100 गरीब व गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अटलास कॉपको इंडिया प्रा.लिमिटेडचे व्यवस्थापक अभिजित पाटील, सी एफ टी आय चे प्रकल्पाधिकारी अमित देशमुख, अस्तित्वचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष अरविंद केदार, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब ठोकळे, अरुण कसबे, सुनिता धनवडे, माजी नगरसेविका सुनिता खडतरे, जितेंद्र जगधने, वाणी चिंचाळेच्या सरपंच प्रियांका गडहिरे, युवा नेते दत्ता टापरे, उद्योजक अजयसिंह इंगवले, माजी नगसेवक किशोर बनसोडे यांच्यासह विविध गावचे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक कुलकर्णी म्हणाले, सायकल वाटपाचे हे काम मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारं आहे. शहाजी गडहिरे यांनी कोविड काळात केलेलं काम हे न विसरणार आहे. अभिजित पाटील म्हणाले की अटलास कॉपकोच्या वतीने दोन हजार मुलींना सायकल वाटप केले असुन हा उपक्रम असाच पूढे चालू ठेऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न चालू ठेवणार आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार म्हणाले की, शहाजी गडहिरे यांच्या माध्यमातून अस्तित्व संस्थेच्या वतीने नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम चालू असतात. त्याचा उपयोग तालुक्यातील वंचीत आणि दुर्लक्षित घटकांना होतो आहे, ही तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
यावेळी अस्तित्वचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी भाषणात अस्तित्वच्या कामाची माहिती दिली. यापुढेही सायकल वाटप कार्यक्रम पुढे चालू ठेऊन सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सी एफ टी आय मुंबईचे अमित देशमुख यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. उपस्थित विद्यार्थीनिनी आपले मनोगत व्यक्त करून अस्तित्व संस्थेचे आभार व्यक्त केलं, आम्ही निश्चितपणे शिक्षण पुर्ण करु ही ग्वाही मुलीनी दिली. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन माधुरी जाधव यांनी केले. त्यानंतर शंभर मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकली वाटप केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण सूर्यगंध, खंडेराव लांडगे, विजय धनावडे, सुनिता गडहीरे, नितीन वाघमारे, विशाल काटे, विराज लांडगे व संकल्प गडहिरे परिश्रम घेतले.