पत्रकार संघटना व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगोल्यात " /> पत्रकार संघटना व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगोल्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन
IMG-LOGO
Home सामाजिक पत्रकार संघटना व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगोल्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन
सामाजिक

पत्रकार संघटना व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगोल्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन

June 2023 80 Views 0 Comment
IMG

पत्रकार संघटना व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगोल्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन


सांगोला (तालुका प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यभरातून पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त दाखल होणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंगळवार २७ जून रोजी दिवसभर सांगोला शहरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय सांगोला यांच्या वतीने मोफत प्रथमोपचार व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. अनेक वारकरी हे पायी चालत आलेले असतात. त्यामुळे पंढरपुरमध्ये आल्यानंतर अनेकांना आरोग्याशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सांगोला तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि ग्रामीण रुग्णालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
       गोवा, कोकण तसेच कोल्हापूर सांगली, मिरज व कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने हरिनामाच्या जयघोषात दाखल होत आहेत. शेकडो मैलांची पायपीट केल्याने अशक्तपणा, हात, पाय, गुडघे, कंबर, मान, पाठ दुखणे तसेच वृद्ध भाविकांना रक्तदाब आणि इतर आजारांचा रस्त्यात त्रास होतो. प्रवासामुळे वारकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन तसेच दिवसभर पायी प्रवास करून दमलेले थकलेले असंख्य वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पत्रकार संघटना व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगोल्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे वतीने सांगोला शहर आणि तालुक्यात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी उपक्रम हाती घेतला आहे.