शहीद जवान शिवाजी पुकळे यांचे बलिदान तरुणांना देशसेवेची प्रेर" /> शहीद जवान शिवाजी पुकळे यांचे बलिदान तरुणांना देशसेवेची प्रेरणा देईल ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
IMG-LOGO
Home सामाजिक शहीद जवान शिवाजी पुकळे यांचे बलिदान तरुणांना देशसेवेची प्रेरणा देईल ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
सामाजिक

शहीद जवान शिवाजी पुकळे यांचे बलिदान तरुणांना देशसेवेची प्रेरणा देईल ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

June 2023 78 Views 0 Comment
IMG

शहीद जवान शिवाजी पुकळे यांचे बलिदान तरुणांना देशसेवेची प्रेरणा देईल ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला : तालुका प्रतिनिधी

घेरडी ता. सांगोला येथील वीर जवान शहीद शिवाजी नारायण पुकळे देशसेवा करत असताना दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी आणि मृत्यूशी लढणाऱ्या शहीद शिवाजी पुकळे यांचे बलिदान तरुणांना देशसेवेसाठी स्फूर्ती आणि प्रेरणा देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. घेरडी ता सांगोला येथे वीर जवान शिवाजी पुकळे यांच्या अंत्यविधीवेळी त्यांना श्रद्धांजली वाहताना ते बोलत होते. यावेळी, आमदार शहाजीबापू पाटील, शेकापचे बाबासाहेब देशमुख, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, आदींसह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून शिवाजी पुकळे या तरुणाने शेळ्या मेंढ्या राखत प्रचंड शारीरिक कसरत आणि अभ्यास करून सैन्य दलात नोकरी मिळवली होती. दहा ते बारा वर्षे देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करणाऱ्या शिवाजीचा दुर्दैवाने अपघात झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आपण त्यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली आणि डॉक्टरांशी चर्चा करून प्रकृती अत्यावस्थ असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील सैन्यासाठी असलेल्या रुग्णालयात पाठवले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. स्व. शिवाजीची प्राणज्योत जरी मालवली असली तरी शिवाजीने आपल्या नावाप्रमाणे घेरडी परिसरात देशसेवेची ज्योत प्रज्वलीत केली आहे. यातून हजारो तरुण प्रेरणा घेऊन सैन्यात दाखल होतील असा विश्वासही यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

शहीद शिवाजी पुकळे यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडणार नाही

स्व. शिवाजीची प्राणज्योत मालवली म्हणून प्रशासनाने आणि राजकीय लोकांनी त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. देशाच्या सेवेत आपली अविरत १० ते १२ वर्षे योगदान देणाऱ्या परिवाराचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि त्यांना सर्वोतोपरी शासकीय सेवा सवलती देण्यात याव्यात तसेच स्व. शिवाजीचा त्याग आणि बलिदान व्यर्थ न घालवता परिवारातील मुलांना शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणीही शेवटी माजी आमदार दिपकआबांनी प्रशासनाकडे केली आणि कोणत्याही परिस्थितीत आपण त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडणार नाही असेही यावेळी स्पष्ट केले.