वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालेल्या काळूबाळूवाडी येथील शेतकऱ्य" /> वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालेल्या काळूबाळूवाडी येथील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना 48 तासाच्या आतमध्ये मदतीचा धनादेश पोहच-आमदार शहाजीबापू पाटील.
IMG-LOGO
Home सामाजिक वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालेल्या काळूबाळूवाडी येथील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना 48 तासाच्या आतमध्ये मदतीचा धनादेश पोहच-आमदार शहाजीबापू पाटील.
सामाजिक

वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालेल्या काळूबाळूवाडी येथील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना 48 तासाच्या आतमध्ये मदतीचा धनादेश पोहच-आमदार शहाजीबापू पाटील.

June 2023 51 Views 0 Comment
IMG

वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालेल्या काळूबाळूवाडी येथील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना 48 तासाच्या आतमध्ये मदतीचा धनादेश पोहच-आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला ( प्रतिनिधी ) काळू बाळू वाडी ता. सांगोला येथील अंगावर वीज पडून मृत पावलेले भगवान शामराव व्हनमाने यांच्या वारस पत्नी श्रीमती शालन भगवान व्हनमाने यांना महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील नैसर्गिक आपत्तीतून शासकीय मदतीचा सुमारे ४ लाख रुपयेचा धनादेश आमदार शहाजी बापू पाटील व तहसीलदार संजय खडतरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

 

काळूबाळू वाडी ता सांगोला येथील मेंढपाळ पशुपालक भगवान शामराव व्हनमाने -४५ हा शेळ्या- मेंढ्या चरण्यासाठी कांबळे वस्ती नजीक ओढ्याच्या परिसरात घेवून गेला होता रविवार ४ जून०२३ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे पावसात अंगावर वीज पडून भगवान व्हनमाने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर याचवेळी कळपातील शेळीच्या अंगावर विज पडून तिचाही मृत्यू झाला होता घटनेनंतर तलाठी साईनाथ रामोड यांनी मृताचा पंचनामा करून अहवाल शासकीय मदतीसाठी सांगोला तहसील कार्यालयाकडे सादर केला होता त्यानुसार काल शुक्रवारी आमदार शहाजी बापू पाटील व तहसीलदार संजय खडतरे यांच्या हस्ते मृताची वारस पत्नी श्रीमती शालन भगवान व्हनमाने यांना सुमारे ४ लाख रुपयेच्या शासकीय मदतीच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष इंगोले, नारायण पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक( गुंडा ) खटकाळे आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, सोमनाथ मरगर आदी उपस्थित होते.

 

काळूबाळू येथील मेंढपाळ पशुपालक भगवान व्हनमाने यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार ४ जून रोजी घडली होती. घटनेनंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी तातडीने पीडित कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना तहसीलदार सांगोला यांना दिला होत्या केवळ सहा दिवसातच आ.पाटील यांनी मृताच्या वारसाला शासकीय आपत्तीतून ४ लाख रुपये मदत देवून कुटुंबाला आधार दिला आहे.