शिक्षणसंस्था चालकाची दहा लाखांची फसवणूक

विद" /> शिक्षण संस्था चालकाची दहा लाखांची फसवणूक
IMG-LOGO
Home क्राईम शिक्षण संस्था चालकाची दहा लाखांची फसवणूक
क्राईम

शिक्षण संस्था चालकाची दहा लाखांची फसवणूक

September 2021 60 Views 0 Comment
IMG

शिक्षणसंस्था चालकाची दहा लाखांची फसवणूक

विदेशातून फंड देण्याच्या बहाणा, मुंबईतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शैक्षणिक संस्थेस इमारत बांधकाम करण्यासाठी 20 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याने मुंबईतील दोघांनी मिळून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची खोटी कागदपत्रे तसेच दुबईतुन फंड मिळाल्याची खोटी माहिती देऊन शिक्षण संस्था चालकाची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिकमहूद ता.सांगोला येथील ऋषीतुल्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णा गोरख पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लालधर शिवप्रसाद चौहान रा.जी 17/303, घरौदा, सेक्टर 9, घनसोली, नवी मुंबई व हैदर अब्बास रिजवी रा. रजिस्टर्ड ऑफिस 201, डि 1/1, यमुना नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ, न्यु लिंक रोड अंधेरी (वेस्ट) मुंबई या दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          चिकमहूद ता.सांगोला येथील आण्णा गोरख पाटील यांची ऋषीतुल्य शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 20 कोटी रुपयांची आवश्यकता होती. कामानिमित्त अण्णा पाटील हे व्यसायनिमित्त मुंबई येथे येत-जात होते. दरम्यान आण्णा पाटील यांचे लालधर शिवप्रसाद चौहान रा.जी 17/303, घरौदा, सेक्टर 9, घनसोली, नवी मुंबई व हैदर अब्बास रिजवी रा. रजिस्टर्ड ऑफिस 201, डि 1/1, यमुना नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ, न्यु लिंक रोड अंधेरी (वेस्ट) मुंबई या दोघांशी अनेक वर्षापासून मैत्रीपुर्ण संबंध होते. या दोघांचा पेंटाप्युअर सर्विसेस प्रा.लि. या नावाने विदेशी फायनान्सचे कर्जे गरजु व्यक्तींना मंजूर करून देण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान आण्णा पाटील यांना ऋषीतुल्य शिक्षण प्रसारक मंडळ या शाळेच्या इमारत बांधकामासाठी वीस कोटी रुपयांची गरज असल्याचे ओळखून हैदर अब्बास रिजवी याने रिझर्व बँक ऑफ इंडियाची खोटी कागदपत्रे व दुबईवरून फंड आल्याची माहिती चिकमहुद येथील संस्थेमध्ये येवून अण्णा पाटील यांना दाखवली. 

 

       फंड देण्यासाठी लालधर चौहान व हैदर रिजवी यांनी  दहा लाख रुपयांची मागणी करून तसा करार स्टॅम्प पेपरवर करून घेतला. त्यानुसार अण्णा पाटील यांनी दहा लाख रुपये लालधर चौहान यांच्या खात्यात आरटीजीएस स्वरूपात जमा केले. दरम्यान अण्णा पाटील यांनी हैदर रिजवी व लालधर चौहार यांच्या विदेशी कर्जाची कागदपत्रे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तपासली असता ती खोटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे पाटील यांनी वरील दोघांकडे दहा लाख रुपयांची मागणी केली असता त्यांनी एक लाख रुपये रोख रक्कम देऊन नऊ लाख रुपयांचा चेक दिला. मात्र, सदरचा चेक न वटता परत आला. अण्णा पाटील यांनी उर्वरित पैशाची मागणी करूनही पैसे देण्यास दोघांनी टाळाटाळ फोनवरून वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चिकमहूद ता.सांगोला येथील ऋषीतुल्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णा गोरख पाटील यांनी लालधर शिवप्रसाद चौहान रा.जी 17/303, घरौदा, सेक्टर 9, घनसोली, नवी मुंबई व हैदर अब्बास रिजवी रा. रजिस्टर्ड ऑफिस 201, डि 1/1, यमुना नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ, न्यु लिंक रोड अंधेरी (वेस्ट) मुंबई या दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.