गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्" /> गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान; ८ आणि ९ जूनला अकोल्यात मुक्काम
IMG-LOGO
Home संस्कृती गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान; ८ आणि ९ जूनला अकोल्यात मुक्काम
संस्कृती

गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान; ८ आणि ९ जूनला अकोल्यात मुक्काम

June 2022 80 Views 0 Comment
IMG

गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान; ८ आणि ९ जूनला अकोल्यात मुक्काम

अकोला : कोरोनामूळे गेल्या २ वर्षापासून बंद असलेली 'श्रीं'च्या पालखीच्या दर्शन अकोलेकरांना मिळणार आहे. या माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी अकोल्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात येणार आहे. शहरातील सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम यामुळे यंदा पालखीच्या मार्गात बदल झाले आहेत. रविवारी दुपारी प्रशासनाकडून हा मार्ग जाहीर करण्यात आला. दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतून अन्यकडे वळविण्यात आली आहे. ६ जूनला शेगावमधून पालखी प्रस्थान... उद्या ६ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महारांजाच्या मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर दुपारी 'श्री क्षेत्र नागझरी' येथे आगमन व पारस येथे मुक्काम करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ७ जून रोजी अकोल्यातील गायगांव येथे आगमन व भौरद येथे मुक्काम करणार आहे. ८ जून रोजी अकोला येथे आगमन व मुंगीलाल बजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम तर ९ जून रोजी जुने शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुक्काम होणार आहे. त्यानंतर १० जून रोजी भरतपूर येथे आगमन व वाडेगाव येथे मुक्काम, त्यानंतर विविध शहरांमध्ये मुक्काम करून पालखी ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे. असा राहील ८ जूनचा पालखीचा मार्ग... अकोल्यातील भौरद येथून अकोला येथे पालखी बुधवारी दाखल होईल. ८ जून रोजी खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट, गजानन चौक, श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, काळा मारोती, लोखंडी पूल, मोठे राम मंदिर, सावताराम मिल समोरून मंगलदार मार्केट, अकोला स्टॅन्ड, संतोषी माता मंदिर, दामले चौक, जुना वाशिम स्टॅन्ड, चांदेकर चौक, कालंका माता मंदिर, स्वावलंबी विद्यालय समोरून मुंगीलाल बजोरीया विद्यालय येथे मुक्काम राहणार आहे. गुरुवारचा म्हणजेचं ९ जूनचा पालखीचा मार्ग... मुंगीलाल बजोरिया विद्यालय समोरून पालखी निघणार अन् पोस्ट ऑफीस, धिंग्रा चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, इन्कमटॅक्स चौक, हिंदू ज्ञानवीठ विद्यालय, आदर्श कॉलनी, बोबडे दूध डेअरी, सिंधी कॅम्प, जेल चौक, अशोक वाटिका, सरकारी बगीचा, सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, हरिहर पेठ, शिवाजी हाऊन हायस्कूल पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार.