मारबत उत्सव

मारबत उत्सव ही नागपूरच्या इति" /> मारबत एक नागपुरी उत्सव

IMG-LOGO
Home संस्कृती मारबत एक नागपुरी उत्सव
संस्कृती

मारबत एक नागपुरी उत्सव

September 2021 169 Views 0 Comment
IMG

 

 मारबत उत्सव

मारबत उत्सव ही नागपूरच्या इतिहासातील मोठी परंपरा आहे. मारबत उत्सवाची सुरूवात इंग्रजांच्या काळात सुरू करण्यात आली.यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना एकत्रित येता यावे.यासाठी याची सुरुवात झाली.कालांतराने हा उत्सव समाजातील वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे या सणाचे उद्दीष्ट ठरले.येणारे विघ्न दुर करण्यासाठी १८८० मध्ये काळ्या मारबतीची सुरूवात झाली.यानंतर १८८४ मध्ये पिवळ्या मारबतीची सुरूवात झाली.आज काळ्या मारबतीला १४१ वर्षे पूर्ण होत आहे तर पिवळ्या मारबतीला १३७ वर्षे पूर्ण होत आहे हा एक इतिहासच म्हणावा लागेल.दोन्ही मारबती मांडण्या मागचा एकच उद्देश होता आणि आहे तो म्हणजे येणारे विघ्न, रोगराई दूर व्हावी.नागपूरसाठी आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे आजही १४१ वर्षे जुनी परंपरा आजही त्याच पद्धतीने पारपाडल्या जाते.हा नागपूरच्या इतिहासातीलच नाही तर भारतीय इतिहासातील परंपरेची धरोहर म्हणावी लागेल.त्याहीवेळेस सलग आठ दिवस पुजा-अर्चना व्हायची आणि आताही होते.त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा होतात.असेही सांगण्यात येते की मारबत ही नवसाला पावणारी असल्याची अनेकांची श्रद्धा आहे.मारबतीच्या दर्शनासाठी अनेक जन नवजात शिशूचे तोंड मारबतीच्या स्तनाला लावण्याची देखील प्रथा आहे.त्यामुळे काळ्या मारबतीचा व पिवळ्या मारबतीला पारंपरिक पद्धतीने महत्त्व दील्या जाते.मारबतीचा सन पोळ्याच्या पाडव्याला म्हणजे तान्हया पोळ्याच्या दिवशी भव्य मिरवणूक काढुन येणाऱ्या विघ्नांच्या व विघटनकारी शक्तीच्या विरोधात जय घोष करून "ईडा-पीडा,माशा-मुरकुट्या, रोगराईला घेऊन जा गे मारबत" अशा घोषणा केल्या जाते व संपूर्ण शहराती नागरिक यात सहभागी होवून संपूर्ण नागपूर दुमदुमते.मोठ्या पोळ्याच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला घरोघरी मेड्यांच्या (पळसाचे) फांद्यांची पुजा केली जाते व दुसऱ्या दिवशी पाडव्याला चौका-चौकामध्ये पळसाच्या फांद्यांचे दहन केले जाते व घोषणा केली जाते "माशा-मुरकुट्या, रोगराईला घेऊन जा गे मारबत"अशा घोषणा केल्या जातात.माझ्यामते सायंटिफिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या पळसाच्या पानांच्या धुर अवश्य जंतुनाशकाचे कार्य करीत असावे यात दुमत नाही.कालांतराने या दिवसाला एवढे महत्त्व आले की भ्रष्ट व कलंकित राजनेता किंवा भ्रष्टाचारी यांच्या विरोधात त्याची प्रतीकृती काढून "बडगा" काढून निषेध केला जातो.त्याच प्रमाणे महागाई,अत्याचार, आतंकवाद, महामारी, बॅंक घोटाळे इत्यादींच्या विरोधात बडग्याच्या रूपात प्रतीकृती काढून निषेध नोंदविला जातो.यात अनेक सामाजिक संघटना (मंडळ) सहभागी होतात.पिवळ्या व काळ्या मारबतीच्या रूपाने आज अनेक विघटनकारी शक्तीचा,अत्याचाराचा विरोध करून समाजात जनजागृती करण्याची काळ्या व पिवळ्या मारबतीपासुनच परंपरा मिळाली आहे असे मी समजतो.कारण यामुळे समाजात राजकीय पुढारी,अत्यारी कोणते घृणास्पद कार्य करतात हे संपूर्ण उघडपणे बडग्याच्या रूपात आपल्याला व देशाला पहायला मिळते व यामुळे समाजात जनजागृती होत असते. म्हणजेच मारबत हा सन समाज जागृतीचा मोठा दिवस असल्याचे मी समजतो.कारण यामुळे राजकीय पुढाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पोल-खोल होत असते.आश्चर्याची गोष्ट म्हणजे १८९७ मध्ये प्लेगची साथ आली होती.त्यानंतर १९२८ मध्ये नागपूरात हिंदू-मुस्लिम दंगल मोठ्या प्रमाणात भडकली होती.तरीही या दोन्ही वर्षी मारबत उत्सवात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही.परंतु मागील वर्षापासून करोना महामारीने पहिल्यांदाच मारबत उत्सवातील मिरवणुकीत विग्घ निर्माण केले.याही वर्षी करोना महामारीचा दुसऱ्या लाटेचा कहर पहाता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पहाता पारंपरिक मारबत उत्सवाची मिरवणुक खंडीत झाली आहे.त्यामुळे मारबत मिरवणूक खंडीत होण्याचे सलग दुसरे वर्ष आहे.मुख्यत्वे करून समाजातील वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे मारबत उत्सव या सनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.मारबत उत्सवात बडग्यांची भुमिका मोलाची असते कारण बडगे हे देशातील विघातक गोष्टींचा निषेध नोंदविनारे असतात.यावर्षी मिरवणुकीवर बंदी नसती तर महागाई, सिलेंडरची दरवाढ, पेट्रोल दरवाढ, शहरातील खड्डे, तालिबान, पाकिस्तान, चीन, आतंवाद,करोना व्हायरस इत्यादींवर शंभरहून अधिक बडगे निघाले असते.परंतु यात करोना महामारीने मोठी खलल टाकली आहे.त्यामुळे संपूर्ण मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु प्रशासनाने पिवळी मारबत व काळी मारबत यांच्या परंपरेत अडथळा निर्माण होवू नये यासाठी प्रशासनाने भव्य मिरवणूक न काढता स्थापन झालेल्या जागेपासून नाईक तलाव येथे दहन करण्याची परवानगी दिली आहे.याचे मी स्वागत करतो.मारबत उत्सवाची सुरूवात नागपूर मधुन झाली.परंतु आता मारबत उत्सव महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात साजरा केल्या जातो.सध्याच्या परिस्थितीत करोना महामारी व तिसऱ्या लाटेची शक्यता पहाता सरकारने अनेक उत्सवावर प्रतीबंध लावले आहे.कारण करोना महामारीचा प्रादुर्भाव वाढु नये.त्यामुळे सर्वांनीच गर्दीचे ठीकान टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे याहीवर्षी संपूर्ण सण साधेपणाने साजरे करावे.कारण "जान है तो जहान है" हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारलि पाहिजे.

लेखक

 रमेश कृष्णराव लांजेवार.

(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.