वाणीचींचाळे येथे दोन मोटारसायकली ची समोरासमोर धडक; एक ठार " /> वाणीचींचाळे येथे दोन मोटासायकल ची समोरासमोर धडक;एक ठार
IMG-LOGO
Home क्राईम वाणीचींचाळे येथे दोन मोटासायकल ची समोरासमोर धडक;एक ठार
क्राईम

वाणीचींचाळे येथे दोन मोटासायकल ची समोरासमोर धडक;एक ठार

December 2023 139 Views 0 Comment
IMG

वाणीचींचाळे येथे दोन मोटारसायकली ची समोरासमोर धडक; एक ठार

सांगोला (तालुका प्रतिनिधी): दोन मोटरसायकलींचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरचा अपघात वाणीचिंचाळे ते वाकीघेरडी रोडवर झाला. 

शंकर संदिपान गडहिरे वय 56, रा.वाणीचिंचाळे ता. सांगोला असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रभाकर संदीपान गडहिरे यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. 

       याबाबत अधिक माहिती अशी, मयत शंकर संदिपान गडहिरे हे एम.एच.45 पी 7053 या मोटरसायकल वरून वाणीचिंचाळे गावाकडे जात होते. दरम्यान समोरून एम.एच. 12 एम.एन. 6460 या मोटरसायकल वरून येणाऱ्या मनोहर माणिक कोडग रा.वाळेखिंडी, ता.जत यांच्या गाडीने विरुद्ध बाजूला जावून गडहिरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात शंकर गडहिरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मिरज येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शंकर संदिपान गडहिरे यांचा मृत्यू झाला.