IMG-LOGO
Home क्राईम विचित्र अपघातात गाडी डिव्हायडर ला धडकून १ ठार , 5 जखमी
क्राईम

विचित्र अपघातात गाडी डिव्हायडर ला धडकून १ ठार , 5 जखमी

September 2023 140 Views 0 Comment
IMG

सांगोला : देवदर्शन करून घराकडे येताना महामार्गावर भरधाव येणाऱ्या कारच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी रोडच्या डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातामध्ये चालक ठार तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सांगली - सांगोला रोडवर एका पुलावर घडली आहे.

    गणेश शिवाजी येळे (रा. कागष्ट, ता. मंगळवेढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ सतीश येळे याने चुलत भाऊ यांच्या मालकीची सुझुकी कंपनीची वॅगनार गाडी नंबर एम. एच 03, ई.बी - 59 58 ही गाडी घेऊन फिर्यादी गणेश येळे, भाऊ सतीश येळे, शिवाजी येळे, चुलत भाऊ संतोष यांची बायको अनिता येळे, मुलगी सुदर्शना असे देवदर्शनाला निघाले होते. सांगोला मार्गे आरेवाडी पुढे आदमापुर येथे बाळूमामाचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथील नरसोबावाडी दर्शन घेतले. नरसोबाच्या वाडीचे दर्शन घेऊन रात्री साडेनऊ वाजता पुन्हा घराकडे येत होते. गाडी फिर्यादीचा भाऊ सतीश हाच चालवत होता. 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सांगली - सांगोला रोडवरील एका पुलावर आले असता गाडीच्या समोर कुत्रे आडवे आले. कुत्र्याला वाचवण्यासाठी महामार्गावर भरधाव वेगात जात असलेल्या कारने रोडवरील डिव्हायडरला कठड्याला, खांबाला धडक दिल्याने आपघात झाला. या अपघातामध्ये भाऊ सतीश याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर शिवाजी पांडुरंग येळे (वय - 65), इंदुमती सतीश येळे (वय - 22), अनिता संतोष येळे (वय - 30), सुदर्शना संतोष येळे (वय - 4, सर्व रा. कागष्ट, ता. मंगळवेढा) हे जखमी झाले असून गाडीचे पाच लाख रुपये नुकसान झाले आहे.