सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी

24 तासाच" /> सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; 24 तासाच्या आत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
IMG-LOGO
Home क्राईम सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; 24 तासाच्या आत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
क्राईम

सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; 24 तासाच्या आत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

June 2023 348 Views 0 Comment
IMG

सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी

24 तासाच्या आत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

 

सांगोला प्रतिनिधी
सांगोला शहरातील रेल्वे स्टेशनच्या समोर मिरज रेल्वे गेट ते वंदे मातरम् चौकाकडे जाणारे बायपास रोडच्या पश्चिम बाजुस रोडच्या कडेला सांगोला येथे अज्ञात इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरुन डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची माहिती सांगोला पोलीस स्टेशन ला सकाळी प्राप्त झाली.घटनेचे गांभीर्य ओळखून सांगोला पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तातडीने सूत्रे हातात घेवून घटनास्थळी जावून तेथील सर्व घटनेचा व घटना स्थळाचा ताबा घेतला व तपास करण्यास चालू केले.सर्वात अगोदर इसमाची ओळख पटविण्याचे काम केले असता त्या इसमाचे नाव संतोष जगन्नाथ साळुंखे, वय ४५ वर्षे, रा. सांगोला असे असल्याचे समजले.घटनास्थळी सर्वत्र तपास करून त्या व्यक्तीचे कोणासोबत वैर नसल्याचे आढळून आले.घटनास्थळी कोणताही पुरावा आढळून आला नाही त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे हे एक आव्हान होऊन बसले.त्यावेळेस पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चार टीम तयार करून विविध अंगाने तपास सुरू केला. तांत्रिक व गोपिनीय माहितीच्या आधारे तपास करून गुन्ह्यात सामील असणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात सांगोला पोलिसांनी यश मिळवले. या तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन बालक असून इतर आरोपीत सुनिल समाधान म्हस्के वय १९ अजय शिवाजी राउत वय १८ दोघे राहणार संजयनगर झोपडपटटी सांगोला यांना अटक करण्यात सांगोला पोलीसांना यश मिळाले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव, उप वि पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अनंत कुलकणी यांचे नेतृत्वाखाली सांगोला पोलीस ठाणकडील सहा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, स पो नि नागेश यमगर, सहा पो नि प्रशांत हुले, स पो नि खरात, सहा फौजदार कल्याण ढवणे, पो.हे.कॉ आप्पा पवार, पो.हे.कॉ दत्ता वजाळे, पो.हे.कॉ वाकीटोळ, पो.ना बाबासाहेब पाटील, पो.ना गणेश मेटकरी, पो.ना तुकाराम व्हरे, पो.ना नागेश निंबाळकर पो.कॉ शशिकांत सांवत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
सांगोला पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.