अवैध वाळू उपसा करणारा पिक अप पकडून वाळूसह १ लाख ५६ हजारां" /> अवैध वाळू उपसा करणारा पिक अप पकडून वाळू सह १लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त
IMG-LOGO
Home क्राईम अवैध वाळू उपसा करणारा पिक अप पकडून वाळू सह १लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अवैध वाळू उपसा करणारा पिक अप पकडून वाळू सह १लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

January 2023 163 Views 0 Comment
IMG

 

अवैध वाळू उपसा करणारा पिक अप पकडून वाळूसह १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त 

सांगोला पोलीस स्टेशन ची दमदार कामगिरी

सांगोला (तालुका प्रतिनिधी): माण नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा पिकअप पकडून वाळूसह १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल सांगोला पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पो.कॉ.निशांत सावंजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीमंत शिवपुत्र बोळकोटगी रा. मेथवडे ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आदेशान्वये पो.कॉ.निशांत सावंजी, पो.हे.कॉ.घोडसे, पो.ना. भोसले व पो.कॉ.वाघमोडे असे एखतपुर हद्दित खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत एक पिकअप बामणी येथील माण नदीपात्रातील वाळू चोरुन भरुन बामणी गावच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्या आधारे पोलीस बातमीच्या ठिकाणी जात असताना साळुंखे मळा या ठिकाणी एम. एच. 10 आर 8414 या पिकअप चालकाला इशारा करून वाहन थांबवण्यास सांगितले. दरम्यान पोलिसांनी पिकअप चालकास श्रीमंत शिवपुत्र बोळकोटगी रा. मेथवडे ता. सांगोला यास पिकअप मध्ये काय आहे विचारपूस करता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. यावर पोलिसांनी पिकअप वाहनाच्या पाठीमागील हौद्यात जावुन पाहीले असता त्यात अंदाजे एक ब्रास वाळू भरलेली दिसून आली. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा पिकअप व ६ हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.