बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास

 

स" /> बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास

IMG-LOGO
Home क्राईम बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास
क्राईम

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास

December 2022 58 Views 0 Comment
IMG

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): एसटी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत काढून घेतल्याची घटना सांगोला शहरातील बसस्थानकात घडली. याप्रकरणी कुसुम दगडू कांबळे रा. करकंब ता. पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

        कुसुम दगडू कांबळे रा. करकंब ता. पंढरपूर या जवळा येथे जाण्यासाठी करकंब येथून अहमदनगर ते सांगोला या बसने सांगोला बस स्थानकात आल्या होत्या. त्यानंतर त्या सांगोला ते जत जाणाऱ्या बसमध्ये चढण्याकरीता दाराजवळ गेल्या त्यावेळी प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान प्रवाशांच्या गर्दीतून बसमध्ये चढत असताना पाठीमागून कोणीतरी अज्ञात चोरट्याने कुसुम कांबळे यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण काढून घेतले. त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या प्रवाशांकडे गंठण चोरी बाबत विचारणा केली असता त्यांना काहीही माहिती मिळाली नाही.