अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला

सांगोला (त" /> अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला

IMG-LOGO
Home क्राईम अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला
क्राईम

अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला

December 2022 49 Views 0 Comment
IMG

अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला

सांगोला (तालुका प्रतिनिधी): मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या पथकाने अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा पिकअप पकडून एक ब्रास वाळूसह २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक सुनिल मोरे यांनी अज्ञात पिकअप चालका विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

      मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांना सांगोला हद्दीत अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मिळालेल्या आदेशानुसार पोलीस नाईक सुनिल मोरे, स.पो.फौ. तोंडले, पो. कॉ. सावंत असे खाजगी वाहनाने सांगोला शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना वाढेगाव ते सावे जाणाऱ्या रोडने एक पिकअप अवैध वाळू भरुन येत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या ठिकाणी पोलीस गेले असता त्यांना समोरुन एक पिकअप येत असलेला दिसला. त्यांनी पिकअपला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने पिक अप जागीच सोडून तो अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीचा पिक अप व ६ हजार रुपयांची एक ब्रास वाळू असा २ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.