विवाहितेचा छळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल" /> विवाहितेचा छळ, तिघांवर गुन्हा दाखल

IMG-LOGO
Home क्राईम विवाहितेचा छळ, तिघांवर गुन्हा दाखल
क्राईम

विवाहितेचा छळ, तिघांवर गुन्हा दाखल

October 2021 117 Views 0 Comment
IMG

 

विवाहितेचा छळ, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला (तालुका प्रतिनिधी):घरातील काम व्यवस्थित येत नाही या कारणावरुन विवाहितेला शारीरिक, मानसिक त्रास दिला. त्यानंतर पतीने दुसरे लग्न केल्याचे समजताच विवाहिता सासरी गेली असता तिला शिवीगाळ, दमदाटी करून घरातून हाकलून दिले. याबाबत हर्षदा बाबासाहेब होनमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवरा बाबासाहेब रामचंद्र होनमाने, सासरे रामचंद्र होनमाने, सासु मालन रामचंद्र होनमाने यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

     गौडवाडी ता.सांगोला येथील हर्षदा बाबासाहेब होनमाने हिचा विवाह जुनोनी ता.सांगोला येथील बाबासाहेब रामचंद्र होनमाने याच्याशी 2014 मध्ये झाला होता. लग्नानंतर हर्षदा हिस नवरा बाबासाहेब रामचंद्र होनमाने, सासरे रामचंद्र होनमाने, सासु मालन रामचंद्र होनमाने हे मुलबाळ होत नाही या कारणावरुन मानसिक त्रास देत होते. घरातील काम व्यवस्थित येत नाही, स्वयपांक येत नाही या कारणावरुन तिला नवरा मारहाण करत होता. दरम्यान नवरा, सासू, सासरे हे त्रास देत असल्याचे हर्षदा हिने आई,वडील, भाऊ यांना सांगितले होते. हर्षदाचे आई वडील तिच्या सासरी आले असता सासरचे लोकांनी तुमच्या मुलीस घरातील काही एक काम येत नाही, ती आमच्या बरोबर भांडण करते, आम्ही तीला नांदवनार नाही असे सांगितल्यानंतर आईवडिलांनी तिला माहेरी घेऊन आले. दरम्यान नवरा बाबासाहेब होनमाने याने कविता शंकर फोडे रा.घोलेश्वर काराजनी ता.जत जि.सांगली हीचे बरोबर लग्न केले असल्याचे हर्षदा हिस समजले. 7 ऑक्टोबर रोजी हर्षदा ही आई वडिलांना घेऊन सासरी जुनोनी येथे आली असता तिला पतीची दुसरी पत्नी दिसली. त्यावेळी सासु, सासरे यांनी तू घरी का आलीस, आम्ही बाबासाहेब याचे लग्न केले आहे असे म्हणून पत्नी बाबासाहेब याने पत्नी हर्षदा हिस शिवीगळ, दमदाटी करुन हाकलुन दिले. याबाबत हर्षदा बाबासाहेब होनमाने हिनेनवरा बाबासाहेब रामचंद्र होनमाने, सासरे रामचंद्र होनमाने, सासु मालन रामचंद्र होनमाने यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.