चिकमहूद येथून दोन जर्शी गायींची चोरी

सांगोला (तालुका प्रति" /> चिकमहूद येथून दोन जर्शी गायींची चोरी
IMG-LOGO
Home क्राईम चिकमहूद येथून दोन जर्शी गायींची चोरी
क्राईम

चिकमहूद येथून दोन जर्शी गायींची चोरी

October 2021 136 Views 0 Comment
IMG

चिकमहूद येथून दोन जर्शी गायींची चोरी

सांगोला (तालुका प्रतिनिधी): अज्ञात चोरट्यांनी घरासमोर बांधलेल्या 90 हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायी चोरून नेल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास चिकमहूद ता.सांगोला येथे घडली. याप्रकरणी मारुती कोंडीबा दबडे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

     चिकमहूद ता.सांगोला येथील पशुपालक मारुती कोंडीबा दबडे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून जर्सी गायी पाळल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी रात्रौ 11 च्या सुमारास दबडे यांनी जर्सी गाई घरासमोर बांधून जेवणखान करून झोपी गेले होते. 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास मारुती दबडे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना घरासमोर बाघलेल्या 90 हजार रुपये किमतीच्या दोन्ही जर्सी गाई दिसून आल्या नाहीत. म्हणुन त्यांनी पत्नीस व मुलास उठवून आपल्या गाई बाघलेल्या ठिकाणी दिसत नसल्याचे सांगून आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु त्या मिळुन आल्या नाहीत. याप्रकरणी मारुती दबडे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.