मोटरसायकल चोरास सांगोला पोलिसांनी पकडले

सांगोला (तालुक" /> मोटारसायकल चोरस सांगोला पोलिसांनी पकडले

IMG-LOGO
Home क्राईम मोटारसायकल चोरस सांगोला पोलिसांनी पकडले
क्राईम

मोटारसायकल चोरस सांगोला पोलिसांनी पकडले

September 2021 199 Views 0 Comment
IMG

मोटरसायकल चोरास सांगोला पोलिसांनी पकडले

सांगोला (तालुका प्रतिनिधी): दुकानासमोर उभी केलेली मोटरसायकल दिवसाढवळ्या चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटरसायकल मालकाने आरडाओरडा केल्यानंतर मोहन दिनकर गुटुगडे रा. तरसवाडी ता.खटाव या मोटरसायकल चोरट्यास पोलिसांनी शिताफीने पकडले. ही घटना 9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात घडली.

 

      एखतपुर ता.सांगोला येथील ताजोद्दीन गुलाब मुलाणी सांगोला शहरातील आणणाभाऊ साठे पुतळ्यासमोर किसान अँग्रो एजन्सी नावाचे ठिबक सिंचन विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मुलाणी यांनी दुकान उघडून एम.एच.13 डी. एन. 2478 ही मोटरसायकल दुकानापुढे उभी केली होती. दरम्यान 9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दुकान बंद करुन 

 

ताजोद्दीन मुलाणी हे समोर असलेल्या सुखानंद मेडिकलमध्ये रक्तदाबाच्या गोळ्या आणण्यासाठी गेले होते. मेडीकलमधून गोळ्या घेऊन येत असताना एक अनोळखी व्यक्ती दुकानासमोर लावलेली मोटरसायकल ढकलत घेऊन जात असताना दिसून आला. यावेळी मुलाणी यांनी चोर-चोर आरडाओरड केला असता जवळच आसलेले पोलीस चौकीतील पोलीस पळत आले. त्यांनी पाठलाग करून मोटरसायकल चोरून घेऊन जात असलेल्या मोहन दिनकर गुटुगडे रा. तरसवाडी ता.खटाव जि.सातारा यास मोटरसायकलसह ताब्यात घेतले. याप्रकरणी ताजोद्दीन मुलाणी यांनी मोहन दिनकर गुटुगडे रा. तरसवाडी ता.खटाव याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.