ट्रॅव्हल्स बसमधून अडीच लाखांची रोकड लंपास

 

सांगोला" /> ट्रॅव्हल्स बसमधून अडीचलाखाची रोकड लंपास.

IMG-LOGO
Home क्राईम ट्रॅव्हल्स बसमधून अडीचलाखाची रोकड लंपास.
क्राईम

ट्रॅव्हल्स बसमधून अडीचलाखाची रोकड लंपास.

September 2021 57 Views 0 Comment
IMG

ट्रॅव्हल्स बसमधून अडीच लाखांची रोकड लंपास

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): ट्रॅव्हल्स बसमधून प्रवासी खाली उतरल्याची संधी साधत चोरट्याने अवघ्या काही मिनिटातच सीटवर ठेवलेल्या बॅगमधून 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 च्या सुमारास हातीद ता.सांगोला येथील शनी गणेश फूड प्लाझा या हॉटेलसमोर घडली.

     उमरेड जिल्हा यवतमाळ याठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणारे नितीन लक्ष्मण आटपाडकर रा.कुरणवाडी ता. माण जि.सातारा हे लग्नासाठी स्वतःचे व मित्रांकडून उसने घेतलेले 2 लाख 60 हजार रुपये बॅगेमध्ये घेऊन गावी कुरणवाडी गावाकडे निघाले होते. 9 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास खरबी या गावातून बीटीपी कंपनीच्या नागपूर ते कोल्हापूर जाणाऱ्या एम.एच 49 बी.एल. 5786 या खासगी ट्रॅव्हल्स मधून प्रवास करत होते. दरम्यान शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7.50 च्या सुमारास सदरची ट्रॅव्हल्स हातीद ता. सांगोला येथील शनी गणेश फूड प्लाझा या हॉटेलवरती चहा-नाश्ता करिता थांबली होती. त्यावेळी नितीन आटपाडकर यांनी पैशाची बॅग बसमध्येच ठेवून टॉयलेटसाठी बसच्या खाली उतरले होते. आठच्या सुमारास नितीन आटपाडकर हे बस मध्ये गेले असता त्यांना सीटवर ठेवलेल्या बॅगची चैन उघडी असल्याचे दिसून आले. त्यांनी बॅगची शोधाशोध केली असता बॅगमध्ये ठेवलेले 2 लाख 60 हजार रुपये दिसून आले नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्याने बॅगमधील रक्कम चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली. याप्रकरणी नितीन आटपाडकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.