न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय " /> न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
IMG-LOGO
Home शैक्षणिक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 2025 240 Views 0 Comment
IMG

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

    वयाच्या 81 व्या वर्षी योगशिक्षक म्हणून संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर यांचे मार्गदर्शन

    

   सांगोला प्रतिनिधी

11 डिसेंबर 2014 साली संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून घोषित केले. तेव्हापासून 21 जून हा दिवस सर्व जगभर राष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असतो आणि योगक्रिया मनुष्याला आरोग्य संपन्न बनवून दीर्घायुष्य करते. याच कारणामुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्व जगभर स्वीकारला जातो, असे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मध्ये 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लाभलेले प्रमुख पाहुणे,

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांना गुरु म्हणून मानणारे, वयाच्या 81 व्या वर्षीही तरुणाला लाजवेल, असे आरोग्य संपन्न व्यक्तिमत्व असणारे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे स्वतः योग करून विद्यार्थी व शिक्षकांना योग क्रियेतून आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे, संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

    या शैक्षणिक संकुला मधील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्यक्ष योग क्रिया करून प्रत्येक योगासनाचा शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसाठी होणारा फायदा व त्याचे महत्त्व स्पष्ट केले. शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहायचं असेल तर प्रत्येकाने दररोज पहाटे योग केले पाहिजेत, म्हणजे आपले व्यक्तिमत्व आरोग्य संपन्न होईल असेही त्यांनी सांगितले. आज वयाच्या 81 वर्षी कोणताही आजार नसून मी आरोग्य संपन्न आहे, याचे एकमेव कारण म्हणजे योग साधना होय. योग क्रिया विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी ही मदत करते, असे संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगितले.

   या प्रसंगी संस्था सदस्य प्रा.डॉ.अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा.केशव माने, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, कार्यक्रम आयोजन समितीचे प्रमुख प्रा. मिलिंद पवार, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सौ. इंदिरा येडगे मॅडम यांनी केले.