सांगोला: प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सांगोल्यात फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात विविध डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्सेस उपलब्ध असुन या कोर्सेसच्या माध्यमातून अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे मत फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे संवेदनाशील प्राचार्य तानाजी बुरुंगले यांनी पञकारांशी बोलताना व्यक्त केले.
फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल चालू आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढतो त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होत आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात करिअरसाठी योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दहावीनंतर डिप्लोमा इंजिनीअरिंग हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. विशेषतः ज्यांना तांत्रिक ज्ञान प्राप्त करून कमी कालावधीत नोकरी मिळवायची आहे त्यांना फॅबटेक कॉलेज मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात करिअर करीत आहेत
डिप्लोमा इंजिनीअरिंगचे फायदे म्हणजे लवकर शिक्षण व करिअरची सुरुवात होणारे शिक्षण आहे. डिप्लोमा कोर्स फक्त तीन वर्षांचा असल्यामुळे विद्यार्थी लवकर शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी पात्र होतात. डिग्री इंजिनिअरिंगसाठी सरळ प्रवेश डिप्लोमा पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षात (डायरेक्ट सेकंड इयर) प्रवेश घेण्याची संधी मिळते. शिवाय तांत्रिक कौशल्यांचा विकास होऊन डिप्लोमा कोर्समध्ये प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड शिक्षण दिले जाते, जे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात लागू करू शकतात
डिप्लोमा कोर्स हा पदवी अभ्यासक्रमाच्या तुलनेत कमी खर्चिक असून तांत्रिक ज्ञानाची मजबूत पायाभरणी करते. फॅबटेक कॉलेज मधील डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या विविध शाखा विद्यार्थ्यांच्या आवडी आणि संधींनुसार डिप्लोमामध्ये खालील प्रमुख शाखा उपलब्ध आहेत. मेकॅनिकल इंजिनीअरिंग–उत्पादन,ऑटोमोबाईल,औद्योगिक क्षेत्रात संधी, सिव्हिल इंजिनीअरिंग– बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सरकारी नोकऱ्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग– मोबाईल नेटवर्क, संचार तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आय टी सेक्टर, नेटवर्किंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केल्यावर उपलब्ध संधी होत असतात.
दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग हा करिअरसाठी एक उत्कृष्ट मार्ग ठरू शकतो. कमी कालावधीत तांत्रिक कौशल्ये विकसित करून विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवता येतात. या शिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही डिप्लोमा फायदेशीर ठरतो. योग्य शाखा निवडून भविष्यातील संधींचा फायदा घेणे हेच यशस्वी करिअरचे रहस्य असल्याचे मत फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य तानाजी बुरुंगले यांनी पञकारांशी संवाद साधताना मत व्यक्त केले आहे