सुनील कांबळे खून प्रकरण: सकल मातंग समाजाच्या वतीने उद्या सा" /> सकल मातंग समाजाच्या वतीने उद्या सांगोला बंदची हाक.
IMG-LOGO
Home राजकारण सकल मातंग समाजाच्या वतीने उद्या सांगोला बंदची हाक.
राजकारण

सकल मातंग समाजाच्या वतीने उद्या सांगोला बंदची हाक.

July 2024 186 Views 0 Comment
IMG

सुनील कांबळे खून प्रकरण: सकल मातंग समाजाच्या वतीने उद्या सांगोला बंदची हाक.

 तहसिल कार्यालयावर निघणार सकल मातंग समाजाचा जन आक्रोश मोर्चा.

सांगोला (प्रतिनिधी)

महुद येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांचा खून अतिशय निर्घृणपणे केला असून त्या गावातील गावगुंडांनी कांबळे यांना मारून दहशत माजवली आहे. या खूनाचा मुख्य सूत्रधाराचा शोध घेवून त्याला अटक करण्यात आली पाहिजे. मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या खूनाच्या निषेधार्थ सांगोला येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भवन येथे नुकतीच सकल मातंग समाजाच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी चिंतन बैठक बोलावली होती. यावेळी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यामध्ये शुक्रवारी सांगोला बंदची हाक देण्यात आली असून तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

      उद्या सकाळी 10 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साठेनगर येथून महात्मा फुले चौकापासून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जन आक्रोश मोर्चात तालुक्यातील मातंग समाजातील स्त्री पुरुष व युवक सहभागी होणार आहेत. तरी या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील सर्व सकल मातंग समाजातील समाज बांधवानी सहभागी व्हावे, असे आवाहन या चिंतन बैठकीत करण्यात आले. सदर चिंतन बैठकीत सांगोला तालुक्यातील व इतर जिल्हयातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सामाजिक कार्यकर्ते स्व:सुनील कांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या चिंतन बैठकीत तालुक्यातील प्रत्येक गावातील मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील कांबळे यांच्या पत्नी मुलगा ,आई ,बहिण यांनी समाजातील समाज बांधवांना भावनिक साथ घालत स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या खुनातील प्रमुख सूत्रधारास अटक करावी आणि आमच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी भावनिक साद घातली.

 

 स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या खूनामुळे तालुक्यातील मातंग समाज पेटून उठला आहे.अशा या मातंग समाजातील युवकाच्या हत्येने सामाजिक चळवळीतील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुनील कांबळे यांच्या खुनातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी ही प्रमुख मागणी यावेळी या चिंतन बैठकीत बोलताना अनेक समाज बांधवांनी व्यक्त केली.