दिपकआबांच्या अथक प्रयत्नांमुळेच छावणी चालकांच्या प्रलंबि" /> दिपकआबांच्या अथक प्रयत्नांमुळेच छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला ; मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
IMG-LOGO
Home राजकारण दिपकआबांच्या अथक प्रयत्नांमुळेच छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला ; मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
राजकारण

दिपकआबांच्या अथक प्रयत्नांमुळेच छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला ; मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

July 2024 95 Views 0 Comment
IMG

दिपकआबांच्या अथक प्रयत्नांमुळेच छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला ; मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील 

सांगोला : तालुका प्रतिनिधी 

सांगोला तालुक्यातील गेली ५ वर्षापासून रखडलेला छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने मार्गी लागला. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानासाठी तब्बल ४० ते ५० वेळा माझी भेट घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही दिपकआबांनी वारंवार पाठपुरावा केला असे प्रतिपादन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले. संबंधित खात्याच्या मंत्र्यानेच याबाबत अधिकृत भाष्य केल्याने सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या श्रेयवादाच्या केविलवाण्या धडपडीला सणसणीत चपराक बसली आहे. 

गेली ५ वर्षे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सुमारे २१४ चारा छावणी चालकांचा अनुदानाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता. सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सुमारे ३६ कोटी रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल बुधवार दि ३ जुलै रोजी स. ११ वा. सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दालनात त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार केला. यावेळी ना. पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह चारा छावणी संघटनेचे परमेश्वर सरगर, विकास देवकते, कैलास माळी, अनिल पाटील, विनायक मिसाळ, प्रवीण नवले, वसंत रूपनर आदीसह सांगोला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षात कार्यरत असणारे चारा छावणी चालक उपस्थित होते. 

पुढे बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री म्हणाले, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी माझी सुमारे 40 ते 50 वेळा भेट घेतली. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. आबांच्या आग्रहाखातर अजितदादा पवार यांनी चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाच्या प्रश्नावर तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश मला दिले. अजितदादा पवार यांचे आदेश आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांचा पाठपुरावा यामुळे चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाची बंद झालेली फाईल पुन्हा उघडून ती मंत्रिमंडळाच्या उपसमिती पुढे मांडण्यात आली. तसेच याबाबत पुन्हा संबंधित विभागाचा अहवाल मागवला आणि या विषयावर गेली ४ ते ५ महिने संपूर्ण मदत व पुनर्वसन विभागाची टीम कामाला लागली. त्यामुळेच चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खऱ्या अर्थाने दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मिळणार असल्याने हे यश माझे नसून ते दिपकआबांचेच असल्याचेही शेवटी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

 

छावणी चालकांच्या संघर्षाला दिपकआबा मुळेच यश 

 

सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांनी आपले प्रलंबित अनुदान मिळावे म्हणून ५ वर्षापासून अनेक नेते आणि अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले. परंतु चारा छावणी चालकांच्या या ज्वलंत प्रश्नाला माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनीच पुढाकार घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली. दिपकआबांनी सर्वपक्षीय चारा छावणी चालकांना सोबत घेऊन याबाबत पाठपुरावा केला. याचे आम्ही सर्व चारा छावणी चालक साक्षीदार आहोत. त्यामुळे हे यश खऱ्या अर्थाने दिपकआबांचेच आहे. याचे श्रेय इतर राजकीय नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये. 

अनिल पाटील, य. मंगेवाडी ,चारा छावणी चालक

 

 

फोटो ; सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालक संघटनेच्या वतीने दिपकआबाच्या उपस्थितीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा सत्कार करताना सर्व चारा छावणी चालक