राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वराज्य सप्ताहास सांगोल्य" /> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वराज्य सप्ताहास सांगोल्यात उत्साहात सुरुवात
IMG-LOGO
Home राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वराज्य सप्ताहास सांगोल्यात उत्साहात सुरुवात
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वराज्य सप्ताहास सांगोल्यात उत्साहात सुरुवात

February 2024 72 Views 0 Comment
IMG

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वराज्य सप्ताहास सांगोल्यात उत्साहात सुरुवात

सांगोला : तालुका प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर दिनांक 12 ते 19 फेब्रुवारी पर्यंत स्वराज्य सप्ताह राबविला जात आहे. रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व दूर पोहोचावेत या संकल्पनेतून याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम तालुक्यामध्ये राबवले जात आहेत.

पारे व सोनंद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक, परिसर सुशोभीकरण व स्वच्छता आणि महाराजांना वंदन करून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.दिनांक 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने परमपूज्य राष्ट्रसंत उदयसिंह देशमुख उर्फ भय्यू महाराज प्रशालेमध्ये तालुकास्तरीय निबंध स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेकरिता तालुक्यातून स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.दि. 14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धायटी येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये रयतेच राज्य शिवरायांचे या विषयावर स्पर्धा पार पडल्या. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेरडी येथे संत तुकाराम महाराज गाथा वाटप करण्यात आल्या. दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रांगोळी स्पर्धा व शिरभावी येथे ॲड.महादेव कांबळे यांचे 'शिवरायांचे रयतेचे राज्य'या विषयावर शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

अशा विविध उपक्रमांनी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक, राष्ट्रवादी महिला आघाडी, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्यावतीने स्वराज्य सप्ताह साजरा होत असून सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची कार्य घराघरापर्यंत पोहोचवण्याकरता मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.