डॉ.अनिकेत देशमुख यांचे शेतकर्‍यांकडून होत आहे कौतुक...! डॉ.अनिकेत देशमुख यांचे शेतकऱ्यांकडून होत आहे कौतुक...!
IMG-LOGO
Home राजकारण डॉ.अनिकेत देशमुख यांचे शेतकऱ्यांकडून होत आहे कौतुक...!
राजकारण

डॉ.अनिकेत देशमुख यांचे शेतकऱ्यांकडून होत आहे कौतुक...!

January 2024 139 Views 0 Comment
IMG

डॉ.अनिकेत देशमुख यांचे शेतकर्‍यांकडून होत आहे कौतुक...!

 

कृषी प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून शेतकरी भारावले

 

सांगोला(प्रतिनिधी):-स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू व शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय नेते डॉ.अनिकेत देशमुख यांच्या संकल्पनेतनू राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणेण रत्न कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी रविवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचे दिसून आले.शेतकरी शेतीची विविध प्रात्याक्षिके पाहून प्रभावित झाल्याचे दिसून आले. कृषी प्रदर्शनाचे आयोजन करुन एक नवीन व्यासपीठ शेतकर्‍यांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ.अनिकेत देशमुख यांचे शेतकर्‍यांकडून कौतुक होत असून कृषी प्रदर्शनाच्या गर्दीने एक विक्रमच केला असल्याचे  दिसून येत आहे .

शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, टोकणीपासून ते लागवडीपर्यंत आणि काढणीपासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत माहिती शेतकर्‍यांना व्हावी हा हेतू सफल होत आहे. शेती, औजारे, बि-बियाणे खते यांची अभ्यासपूर्ण माहिती देणार्‍या स्टॉलवर शेतकर्‍यांची गर्दी दिसून येत आहे. युवा शेतकर्‍यांना दिशा देणारे हे प्रदर्शन ठरत आहे. तालुक्यातील उत्पादित केलेला भाजीपाला-फळाफुलांनी कृषी प्रदर्शनात लक्ष वेधले.

डॉ.अनिकेत देशमुख यांनी सांगोला तालुक्यात  कृषी क्षेत्रात स्वयंपूर्णता यावी म्हणून कृषी प्रदर्शनीचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून  राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले . शेतकरी हा मुळातच कार्यप्रवण असल्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाबद्दल अतीवउत्सुकता असते. नेमकी ही बाब हेरून शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले ही अभिनंदनीय बाब आहे.

कृषी प्रदर्शन पाहण्यास  जिल्ह्यासह  तालुक्यातील शेतकरी मोठा प्रतिसाद देत आहेत. या कृषी प्रदर्शनातून शेतकर्‍यांना आधुनिक यंत्रासह कृषी क्षेत्रातील नवीन नवीन प्रयोग तंत्रज्ञान पाहायला भेटले निश्चितच या प्रदर्शनातून शेतकर्‍यांना आधुनिक शेती विषयी दिशा मिळाली असून कृषी प्रदर्शनीच्या आयोजनाचा हा उपक्रम अतिशय स्तूत्य असून, डॉ.अनिकेत देशमुख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुढेही डॉ.अनिकेत देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेस, गोरगरीब, शेतकरी बांधवांना उपयुक्त असणारे असे  नवनवीन उपक्रम राबवावेत अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.