जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार दिपकआबांची निवड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार दिपकआबांची निवड
IMG-LOGO
Home राजकारण जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार दिपकआबांची निवड
राजकारण

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार दिपकआबांची निवड

December 2023 222 Views 0 Comment
IMG

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार दिपकआबांची निवड

सांगोला : तालुका प्रतिनिधी

जिल्ह्याचा सर्वांगीण विकासात सर्वात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर (डी.पी.डी.सी.) विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य पाच जणांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने लेखी पत्राद्वारे माजी आमदार दीपक आबासह सर्वांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे गेली अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. सोलापूर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे राज्याच्या विधिमंडळात त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. अनेक वर्षे ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या निवडीमुळे रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल तसेच अनेक वर्षे या समितीवर काम करण्याचा अनुभव त्यांना असल्याने त्यांच्या अनुभवाचा समितीलाही नक्कीच लाभ होणार आहे.

 

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करणारी अत्यंत महत्वाची समिती आहे. याद्वारे राज्य सरकारकडून जास्तीत जास्त विकासनिधी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी खेचून आणू आणि जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न करू तसेच जिल्ह्याच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासासाठी समिती मधील सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न करू ;

मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर