शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीचे 24 हजार सभासद " /> शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणीचे 24 हजार सभासद वगळले;सहकार क्षेत्रात खळबळ
IMG-LOGO
Home राजकारण शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणीचे 24 हजार सभासद वगळले;सहकार क्षेत्रात खळबळ
राजकारण

शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणीचे 24 हजार सभासद वगळले;सहकार क्षेत्रात खळबळ

December 2023 124 Views 0 Comment
IMG

शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीचे 24 हजार सभासद वगळले; सहकार क्षेत्रात खळबळ

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा जिल्ह्यातील सभासद असलेल्या सांगोल्यातील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, शेअर्सची रक्कम अपूर्ण असल्याचा ठपका ठेवत अंतिम मतदार यादीतून सांगोल्यातील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीचे सुमारे २४ हजार सभासद वगळल्याने सांगोल्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत काही सभासदांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 

       सांगोल्याच्या माळारानावर महिलांसाठी रोजगार निर्मिती उपलब्ध व्हावी यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीची स्थापना केली उभारणी केली. या सूतगिरणीच्या उभारणीसाठी सोलापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा जिल्ह्यातील सुमारे २६ हजार महिलांनी शेअर्स खरेदी करून आर्थिक हातभार लावला. सूत गिरणीच्या स्थापनेपासून आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुख हयात असताना महिला सूतगिरणीचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे सुरू होता. 

      मात्र स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षात महिला सूतगिरणीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याने सूतगिरणीच्या कामकाजावर सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच येत्या महिनाभरात शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांच्या कार्यालयाने शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत कापूस उत्पादक गटात १ हजार ६२९, बिगर कापूस उत्पादक गटात ७२१ व संस्था गटात ६ अशा २ हजार ३५६ सभासदांची यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या सभासदांनी शेअरची रक्कम अपूर्ण असल्याने असल्याचा ठपका ठेवत अंतिम मतदार यादीतून २४ हजार सभासदांची नावे वगळली आहेत. यामुळे सांगोल्याच्या सहकार तसेच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

 

सांगोला तालुका शेतकरी महिला वस्त्रनिर्माण सह. सुतगिरणीच्या स्थापनेवेळी २६ हजार सभासद होते. सर्वसामान्य महिलांनी पदरमोड करून शेअर्स खरेदी केले. आजपर्यंत सर्व निवडणू‌कांमध्ये सभासद पात्र होते. मात्र संचालक मंडळाने सभासदांना विश्वासात न घेता, नोटीस न घेता सुमारे २४ हजार सभासद अपात्र करून महिला सूत गिरणी मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. - सागर लवटे लोटेवाडी, संचालक डॉ.भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणी, सांगोला

 

महिला सूत गिरणीचे २६ हजार २७० सभासद असून २ हजार ३५६ सभासदांनी शेअर्सची रक्कम पूर्ण भरली आहे. २०१३ पासून प्रत्येक वार्षिक सभेत शेअर्स पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. ज्या सभासदांनी शेअर्स पूर्ण आहेत त्यांचीच नावे अंतिम मतदार यादीत आहेत. ज्यां सभासदांचे शेअर्स पूर्ण आहेत त्यांचीच माहिती आम्ही प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांना दिली होती. - कृष्णदेव गावडे, प्रभारी कार्यकारी संचालक तथा कल्याण अधिकारी शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणी सांगोला.