पक्षाकडूने मला सांगितले आहे की, काम करत पुढे चला; कोणाच्या टी" /> पक्षाकडूने मला सांगितले आहे की, काम करत पुढे चला; कोणाच्या टीकेकडे लक्ष देऊ नका- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
IMG-LOGO
Home राजकारण पक्षाकडूने मला सांगितले आहे की, काम करत पुढे चला; कोणाच्या टीकेकडे लक्ष देऊ नका- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
राजकारण

पक्षाकडूने मला सांगितले आहे की, काम करत पुढे चला; कोणाच्या टीकेकडे लक्ष देऊ नका- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

November 2023 22 Views 0 Comment
IMG

  पक्षाकडूने मला सांगितले आहे की, काम करत पुढे चला; कोणाच्या टीकेकडे लक्ष देऊ नका- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

  सांगोला (तालुका प्रतिनिधी): मला काही लोक समाजमाध्यमांतून ट्रोल करतात परंतु मी माझ्या कामानेच उत्तर देणार आहे. पक्षाकडून मला सांगितले आहे की, पुढे काम करत चला. कोणाच्या विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. आज स्टेजवर कोण आहे किंवा नाही हे पाहू नका. पार्टी तिकीट दिल्यानंतर एका स्टेजवर सर्वजण येतील, याची काळजी करू नका. माळशिरस तालुक्यात रस्त्यांसाठी १५० कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. नीरा देवधर प्रकल्पाचे थोड्या दिवसांत टेंडर होऊन काम चालू होईल. त्यामुळे पुढील निवडणूक पाण्यासाठी होणार नाही. फलटण- पंढरपूर रेल्वेमार्ग काम चालू होईल. माढा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न मिटवल्याशिवाय येत्या लोकसभेचा अर्ज भरणार नसल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा नातेपुते येथे संपन्न झाला. यावेळी लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी खा.रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, दीपकआबा साळुंखे-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे, उत्तमराव जानकर, , के.के. पाटील, जयकुमार शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले, मतदारसंघातील लाखो जनतेचा निरंतर विचार करणारे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे स्नेह करावा असा माणूस आहे. खासदारांच्या स्नेह मेळाव्याला यावे अशी खूप इच्छा होती. मात्र 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुक प्रमुख पदाची जबाबदारी असल्याने तसेच लोकसभा निवडणुक प्रमुखांचे प्रशिक्षण वर्ग असल्याने या स्नेह मेळाव्याला येवू शकलो नाही. 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी खा. निंबाळकर हे अथक परिश्रम करीत आहेत. मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खा.रणजितसिंह निंबाळकर अथक प्रयत्न करीत आहेत. अशा सक्षम आणि दमदार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाला न्याय देणाऱ्या खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यामुळे सांगोला तालुक्याला आठ टीएमसी पाणी मिळाले आहे. त्यामुळे तालुका सुजलाम् सुफलाम् होणार आहे. तालुक्याच्या कोणत्याही विकास कामासाठी खासदार निंबाळकर तत्पर असतात असे त्यांनी सांगितले.