पंढरपूर मंदिर समितीने उभारले 12 शेड:आषाढीला दर्शनरांगेत एका वे" /> पंढरपूर मंदिर समितीने उभारले 12 शेड:आषाढीला दर्शनरांगेत एका वेळी उभ्या राहणाऱ्या 12 हजारांवर भाविकांचे ऊन-पावसापासून होणार संरक्षण
IMG-LOGO
Home सामाजिक पंढरपूर मंदिर समितीने उभारले 12 शेड:आषाढीला दर्शनरांगेत एका वेळी उभ्या राहणाऱ्या 12 हजारांवर भाविकांचे ऊन-पावसापासून होणार संरक्षण
सामाजिक

पंढरपूर मंदिर समितीने उभारले 12 शेड:आषाढीला दर्शनरांगेत एका वेळी उभ्या राहणाऱ्या 12 हजारांवर भाविकांचे ऊन-पावसापासून होणार संरक्षण

June 2023 63 Views 0 Comment
IMG

पंढरपूर मंदिर समितीने उभारले 12 शेड:आषाढीला दर्शनरांगेत एका वेळी उभ्या राहणाऱ्या 12 हजारांवर भाविकांचे ऊन-पावसापासून होणार संरक्षण


पंढरपूरमध्ये यंदा कमाल 15 लाख भाविक येण्याची शक्यता, दर्शनरांगेतच पिण्याचे पाणी, स्वच्छता, चहा, नाष्टा, जेवणाची होणार सोय.


२० जूनपासूनच भाविक येण्यास होईल प्रारंभ, त्यांच्या सोयीसाठी रांगेत मॅटचीही केली सुविधा

 

पंढरपूर   प्रतिनिधी                     श्रीक्षेत्र पंढरपूर येथे २९ जून रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशभरातून तब्बल १२ ते १५ लाख भाविक येणार आहेत. त्यापैकी ६ ते ८ लाख भक्त रांगेत उभा राहून विठुरायाचे दर्शन घेतात. त्यांची दर्शनरांग सुमारे ५ ते ६ किलोमीटरपर्यंत जात असते. आतापर्यंत या भाविकांच्या सुरक्षेसाठी चारच शेड होते. मात्र मंदिर समितीने या वर्षी त्यात आठने वाढ केली आहे. आता दर्शनरांगेत एकूण १२ शेड‌्सचे संरक्षण असेल. त्याद्वारे एका वेळी सुमारे १० ते १२ हजार भाविकांचे ऊन-पावसापासून संरक्षण होऊ शकेल. तसेच रांगेतच चहा, नाष्टा, जेवण देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

आषाढी यात्रेदरम्यान पाऊस येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रांगेत उभा राहणाऱ्या वारकऱ्यांना डोक्यावर पाऊस आणि पायाखाली चिखल, माती अशा परिस्थितीत विठ्ठलदर्शन घ्यावे लागते. भाविकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी अलीकडे मंदिर समितीकडून रांगेत डोक्यावर प्लास्टिकचे आच्छादन टाकले आणि काही भागांत चिखल होऊ नये, पायाला खडे टोचू नयेत म्हणून मॅट टाकली जात आहे.

माेफत आरोग्यसेवा, शौचालयाची सुविधा : दर्शनरांगेत वारकऱ्यांना २४ तास पिण्याचे थंड, जारचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. शिवाय दोन वेळा चहा, नाष्टा आणि खिचडी, जेवणाचीही सोय केली जाणार आहे. दर्शनरांगेत जागोजागी शौचालये, हंगामी आणि कायमस्वरूपी शौचालये उभी केली जात आहेत. दर्शनरांगेत स्वच्छता राहील याचीही दक्षता मंदिर समितीने घेतली आहे. शिवाय प्रथमोपचार सुविधा, रुग्णवाहिका याचीही तातडीची सेवा म्हणून सोय केली जात असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

दर्शनरांगेसाठी उभारलेले शेड.
एका शेडमध्ये १२०० भाविकांची, तर स्कायवॉकवर २००० जणांची सोय
यंदा आषाढी यात्रेच्या निमित्ताने पत्राशेडच्या संख्येत वाढ केली. दरवर्षी कायमस्वरूपी उभे केलेले ४ आणि हंगामी ४ ते ६ पत्राशेड उभारले जाते. यंदा हंगामी शेडची संख्या ८ केली आहे. त्यामुळे एकूण १२ शेड्स उपलब्ध असतील. एका शेडमध्ये किमान १ हजार ते १२०० भाविक एका वेळी उभा राहू शकतात. त्यामुळे दर्शन शेडमध्ये किमान १२ हजार भाविकांची व्यवस्था होईल. तसेच सुमारे ४०० मीटर्स लांबीच्या स्कायवॉकवर २ हजारांहून अधिक वारकरी उभे राहू शकतात.

स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचीही असेल वारकऱ्यांसाठी सुविधा
आषाढीचा सोहळा २९ जून रोजी असला तरी २० जूनपासूनच पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यांना सर्व सुविधा देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न असेल. म्हणूनच यंदा शेडची संख्या १२ केली आहे. रांगेत मॅटही टाकले जातील. पिण्याचे पाणी अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले जाईल. रांगेत स्वच्छता राहील, भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. - बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, मंदिर समिती