अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षा 2023 मध्ये फॅबटेक पब्लिक स" /> अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षा 2023 मध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश
IMG-LOGO
Home शैक्षणिक अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षा 2023 मध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश
शैक्षणिक

अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षा 2023 मध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

November 2023 180 Views 0 Comment
IMG

अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षा 2023 मध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

 
सांगोला प्रतिनिधी 
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आजादी का अमृतमहोत्सव, महात्मा गांधी राजभाषा हिंदी परीक्षा 2023 मध्ये सुयश संपादन केले आहे.स्कूलमधील 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, ए.ओ. वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर उपस्थित होते. इयत्ता पाचवीतील 8 विद्यार्थ्यी,सहावीमधील 12,सातवीतील 13,आठवीमधील 3 विद्यार्थांना गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या  हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच इयत्ता आठवीतील कु. चैतन्य भालेराव यास ए. प्लस गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले. तसेच  स्कूलचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील यांना मार्गदर्शक प्राचार्य म्हणून गोल्ड मेडल प्रशस्तीपत्रक व बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख सौ.सानवी पाटील यांना गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्रक कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय अदाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर  डॉ.संजय अदाटे स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली पाटील यांनी केले.