IMG-LOGO
Home सामाजिक समर्थ बँकेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न
सामाजिक

समर्थ बँकेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

August 2021 328 Views 0 Comment
IMG

समर्थ बँकेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न.

सांगोला प्रतिनिधी

समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा बँकेचा मानस आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज समर्थ बँकेतील जुळे सोलापूर शाखेमध्ये डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. 

25 व्या वर्षानिमित्त 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केले.

लोकमंगल बँकेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जुळे सोलापूर भागातील डॉक्टर संदीप भागवत, डॉक्टर सचिन कुलकर्णी,पेठे उद्योग समूहाचे दिलीप पेठे, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रंगनाथ बंकापूर, विद्या कॉम्प्युटर्स चे अमित कामतकर, सुनील कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

   याप्रसंगी सर्वप्रथम समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून या रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली त्यानंतर बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी सर्वांचे स्वागत केले. संचालक मोहन दाते यांनी सर्वांचे आभार मानले.

बँकेचे संचालक श्रीनिवास कुमठेकर, श्रीकृष्ण कालेकर, रमेश कोल्हापुरे,राजेश पटवर्धन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक प्रशांत बडवे यांनी केले. याप्रसंगी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि बँकेचे हितचिंतक खातेदार ,सभासद आदी उपस्थित होते.