१०८ ठरतोय रुग्णांचा आधार, वर्षभरात ७० हजार नागरिकांनी घेतला ला" /> १०८ ठरतोय रुग्णांचा आधार, वर्षभरात ७० हजार नागरिकांनी घेतला लाभ
IMG-LOGO
Home आरोग्य १०८ ठरतोय रुग्णांचा आधार, वर्षभरात ७० हजार नागरिकांनी घेतला लाभ
आरोग्य

१०८ ठरतोय रुग्णांचा आधार, वर्षभरात ७० हजार नागरिकांनी घेतला लाभ

December 2022 151 Views 0 Comment
IMG

१०८ ठरतोय रुग्णांचा आधार, वर्षभरात ७० हजार नागरिकांनी घेतला लाभ

 

35 रुग्णवाहिका, आपत्कालीन स्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार 

 

 

सांगोला (प्रतिनिधी): एखादा अपघात झाला, कोणाला भाजले, कोणाला हृयविकाराचा झटका आला अथवा बाळंतपणासाठी एखाद्या महिलेला तातडीने जायचे झाले, तर डायल १०८ रुग्णवाहिका सेवेची अनेकांना आठवण होते. वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात ७० हजार ६८४ जणांनी आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. 2014 पासून ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत रस्ते अपघातातील सुमारे २१ हजार ७६२ जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्‍य झाले आहे

       राज्य आरोग्य विभागाने रुग्णांना आपत्कालीन सेवा मिळावी, म्हणून राज्यात १०८ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी या क्रमांकावर फोन केल्यास त्यांना तत्काळ आवश्यकतेप्रमाणे डॉक्टरांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका पाठवून मदत केली जाते. सोलापूर जिल्ह्यातून सहा ते सात महामार्ग जात असल्याने अपघाताचे प्रमाणदेखील जास्त आहे. अशा वेळी नागरिकांना १०८ ची सेवा खूपच जीवनदायी ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यात 35 रुग्णवाहिका असून त्यावर 76 डॉक्टर व 82 चालक कार्यरत आहेत.

       अपघातग्रस्तांना लगेचच आवश्‍यक प्राथमिक उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत रुग्णवाहिकेद्वारे रस्ता अपघात, हाणामारी, जळीत रुग्ण, हृदयरोगी, विषबाधा, सर्पदंश, प्रसुती रुग्ण, वीज पडून होणारे अपघात, सर्वसामान्य आजार, आत्महत्या अशा विविध रुग्णांना रुग्णालयापर्यंत वेळेवर पोहोचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले जातात. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवर मध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे सोलापूर जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षात सुमारे ४ लाख ४६ हजार ६३३ हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 

 

 

 

 

 

गेल्या वर्षभरात लहान अपघात १२३७, ट्रामा (मोठे अपघात) ३ हजार ९१६, दुखापती ४८९, भाजणे ६६, हृदयविकाराचा झटका ७९९, उंचावरून पडणे २९५, विषबाधा ५३०, गर्भवती प्रसूती ६ हजार ७९३, विद्युत झटका ४, वैद्यकीय ४४ हजार ५७२, आत्महत्या २६, हल्ला किंवा मारहाण ४८९ अशा सोलापूर जिल्ह्यातील ७० हजार ६८४, रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका लाईफलाईन ठरली आहे.

 

 

 

 

 

 

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवर मध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक 108 रुग्णवाहिकेची सेवा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 2014 मध्ये 8 हजार 789, 2015 मध्ये 15 हजार 519, 2016 मध्ये 62 हजार 034, 2017 मध्ये 66 हजार 629, 2018 मध्ये 78 हजार 064, 2019 मध्ये 52 हजार 228, 2020 मध्ये 36 हजार 823, 2021 मध्ये 5 हजार 862, २०२२ मध्ये ७० हजार ६८४ अशा सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ४६ हजार ६३३ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

 

 

  

 

 

 

गेल्या नऊ वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चांगली वैद्यकीय सेवा मिळाली आहे. गर्भवती महिलांना होणारा त्रास, प्रसुती यासाठी 108 रुग्णवाहिकेचा खुप फायदा होत आहे. अपघातात अति गंभीर झालेल्या रुग्णांना, व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना 108 रुग्णवाहिकेमुळे जीवनदान मिळाले आहे. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात 108 रुग्णवाहिकेचा मोलाचा वाटा राहिला. - डॉ.अनिल काळे, जिल्हा समन्वयक, 108 रुग्णवाहिका