सांगोला विद्यामंदिरचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय विजयी सांगोला विद्यामंदिरचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय विजयी
IMG-LOGO
Home खेळ सांगोला विद्यामंदिरचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय विजयी
खेळ

सांगोला विद्यामंदिरचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय विजयी

September 2023 154 Views 0 Comment
IMG

सांगोला विद्यामंदिरचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय विजयी

सांगोला प्रतिनिधी 

दिनांक १५ सप्टेंबर रोजी अकलूज या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये १९ वर्षे वयोगट मुली बास्केटबॉल स्पर्धा अंतिम सामन्यात सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला हा संघ विजयी झाला.

 या संघाने सुरुवातीस माढा तालुक्याच्या संघांचा पराभव करून अंतिम सामन्यात पंढरपूर तालुक्याचा पराभव करत अंतिम सामना जिंकला.

बास्केटबॉल संघ:- तनाज मण्यार, अनघा बोत्रे, सुप्रिया भुईटे, स्नेहा फुले, ऐश्वर्या घोंगडे, सायली वाघमारे, प्राची पाटील, तनिषा गुळवे, तृप्ती भोसले, आसावरी कुलकर्णी, अमृता लोहार, मेघा चव्हाण. हे खेळाडू सहभागी झाले होते.

वरील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रशाला - सुनील भोरे सर, क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज- प्रा. डी.के पाटील,नरेंद्र होनराव , अन्सार इनामदार , सुभाष निंबाळकर , प्रा.संतोष लवटे. यांचे मार्गदर्शन लाभले.

 वरील सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मा. मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार मा. शंकरराव सावंत सर,सहसचिव मा. प्रशूद्धचंद्र झपके साहेब, संस्था सदस्य मा. विश्वेशजी झपके,प्राचार्य गंगाधर घोंगडे सर, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते सर, उपप्राचार्या सौ शाहिदा सय्यद मॅडम, पर्यवेक्षक - बिभीषन माने सर, पोपट केदार सर (क्रीडा नियंत्रक), अजय बारबोले सर. सर्व अध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागस्तरासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.