IMG-LOGO
Home आरोग्य बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची आषाढी वारी २०२३ मध्ये तातडीची वैद्यकीय सेवा, ४५० रुग्णांचा जीवनदान तर ७१०५ रुग्णांना वैद्यकीय उपचार.
आरोग्य

बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची आषाढी वारी २०२३ मध्ये तातडीची वैद्यकीय सेवा, ४५० रुग्णांचा जीवनदान तर ७१०५ रुग्णांना वैद्यकीय उपचार.

June 2023 247 Views 0 Comment
IMG

बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची आषाढी वारी २०२३ मध्ये तातडीची वैद्यकीय सेवा, ४५० रुग्णांचा जीवनदान तर ७१०५ रुग्णांना वैद्यकीय उपचार.
पुणे प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आषाढी वारी २०२३ मध्ये बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांच्या ७५ रुग्णवाहिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा , संत सोपान महाराज पालखी सोहळा , या पालखी सोहळ्याच्या प्रस्तानापासून तर पंढरपूर पर्यंत व पंढरपूर मध्येही डायल १०८ सुविधेचा उपयोग वारकऱ्यांना घेता येईल.पालखी सोबत व पालखी मार्ग मध्ये ठिकठिकाणी डायल १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुठल्याही आपात्कालीन वैद्यकीय प्रसंग उद्भावयास १०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास तात्काळ रुग्णवाहिका वारकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल.वारकऱ्यांना रुग्णवाहिका सेवा त्वरीत उपलब्ध व्हावी म्हणून बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांनी आषाढी वारी २०२३ करिता जिल्हानिहाय रुग्णवाहिकेचे स्वतंत्र नियोजन केले आहे.
एकूण ७५ रुग्णवाहिका
(२२ ALS व ५३ BLS)
पुणे जिल्हा एकूण ५३ रुग्णवाहिका
(१४ ALS ३९ BLS)
सातारा जिल्हा एकूण ६ रुग्णवाहिका
(१ ALS व ५ BLS)
सोलापूर जिल्हा एकूण १६ रुग्णवाहिका
( ७ ALS व ९ BLS)

पंढरपूर शहर मध्ये २९ जून २०२३ आषाढी एकादशीला ला सुद्धा १५ स्वतंत्र रुग्णवाहिकेचे नियोजन केले आहे ह्या रुग्णवाहिका आषाढी एकादशीच्या आधीपासून उपलब्ध करून देण्यात येतील.
यावर्षी पंढरपूर मध्ये आरोग्य विभागाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे त्यामध्ये देखील डायल १०८ सेवेच्या १५ स्वतंत्र रुग्णवाहिकेची नियोजन केले आहे . डायल १०८ ची सेवा प्रभावी पने देता यावी म्हणून पंढरपूर मध्ये डायल १०८ चे नियंत्रण कक्ष शुरू करयात येणार आहे व हे नियंत्रण कक्ष तेथील EOC (Emergency Operating Centre) शी समन्वय साधून सेवा प्रभावी पने देतील. बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ च्या माध्यमातून २०१४ पासुन २०२३ पर्यंत वर्षनिहाय अतिजोखामिच्या एकूण ४९७९ रुग्णांना डायल १०८ ची सेवा देऊन जीवनदान मिळाले.