आषाढी वारीमध्ये बेवारस पेशंट साठी 108 ठरली वरदान


आषाढी वारीमध्ये बेवारस पेशंट साठी 108 ठरली वरदान
IMG-LOGO
Home आरोग्य आषाढी वारीमध्ये बेवारस पेशंट साठी 108 ठरली वरदान
आरोग्य

आषाढी वारीमध्ये बेवारस पेशंट साठी 108 ठरली वरदान

June 2023 293 Views 0 Comment
IMG

आषाढी वारीमध्ये बेवारस पेशंट साठी 108 ठरली वरदान


जीव झाला कासावीस , रूप दाव विठ्ठला...


पंढरपूर प्रतिनिधी
विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वसामान्य माणसां बरोबरच वयोवृद्ध, स्त्री, पुरुष ,लहान मुले यांना सर्वांना सारखीच लागलेले असते.संत मंडळींच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या असताना ,लाखोंच्या संख्येने वारकरी पायी वारीमध्ये सहभागी झालेले असतात. विठुरायाच्या ओढीने सर्वसामान्य भाविक वारकरी हा पंढरीला येऊन आपल्याला विठ्ठलाचे दर्शन कसे घडेल याचा विचार करीत असतो. असाच एक भाविक वारकरी शरद गायकवाड मुक्काम पोस्ट पंचवटी करंजा जिल्हा नाशिक वय ५२ हे विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप पत्रा शेड 2 मध्ये दर्शन रांगेमध्ये उभा असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने आता काय करावे हा विचार त्यांच्या मनामध्ये असताना चक्कर याला सुरुवात झाली. त्याच वेळेस त्यांच्या शेजारी उभा असणारे उत्तम बटाने या भावी भक्ताने १०८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सविस्तर माहिती दिली असता पंढरपूर मंदिर समितीची मध्ये वारकऱ्यांच्या सेवेसी असणारी बी व्ही जी १०८ ची ॲम्बुलन्स व डॉ.ऋषिकेश चांगन व पायलेट सचिन अहिरे यांच्यासह पत्रा शेड दर्शन रांगेमध्ये पोहोचले पेशंटला व्यवस्थित रांगेतून बाहेर काढून, त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पोच करण्यात आले. यावेळेस आजूबाजूला असणाऱ्या माऊली भक्तांनी व पोलिसांनी आजारी व्यक्तीला मदत केली.
पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांना त्वरित सेवा उपलब्ध व्हावी यासाठी बीव्हीजी व महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा डायल 108 यांनी आषाढी वारी 2023 करता एकूण ७५ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सर्व रुग्णवाहिका बीव्हीजी 108 चे कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके, ऑपरेशन हेड डॉ. दीपक कुमार ओके, पुणे विभाग झोनल मॅनेजर डॉ. विठ्ठल घोडके, सोलापूर जिल्हा कॉर्डिनेटर डॉ.अनिल काळे,
एडिएम किरण वाघमोडे, सुपरवायझर सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील 108 ॲम्बुलन्स उत्तम कार्यरत आहेत.