अत्यावश्यक सेवेसाठी वारकऱ्यांनी 108 ॲम्बुलन्स चा लाभ घ्यावा -डॉ." />
पंढरपूर प्रतिनिधी
आषाढी वारीमध्ये आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर डॉ राधाकृष्ण पवार यांनी 108 अंबुलान्स चारे येथे भेट देण्यास आले असता, अंबुलन्स मध्ये अस्वस्थ असलेला लहान मुलगा वारीमध्ये चक्कर येऊन पडला असता चारे लोकेशनच्या ॲम्बुलन्स ला वारी मधून कॉल मिळाला असता चारे लोकेशनच्या डॉक्टरांनी व पायलेट यांनी तो पेशंट अटेंड केला ,त्याच वेळेस आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर अचानक वारीतील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले असता पालखी मार्गावरील ॲम्बुलन्स मध्ये डॉक्टर व पायलट यांनी पेशंट ॲम्बुलन्स मध्ये घेऊन त्याला वेळीच उपचार सुरू केले होते. वारकऱ्यांच्या वेशामध्ये असलेले डेप्युटी डायरेक्टर हे येथील डॉक्टरांचे व पायलेट यांचे कार्य बघत होते. त्यावेळी त्यांनी वेळीच उपचार केल्यामुळे पेशंटला बरे वाटू लागल्याचे पाहता ई एम एस ओ व पायलट यांनी पेशंट पुढील उपचारासाठी पंढरपूर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येथे रेफर केले. यावेळी मूळचे डॉक्टर असणारे व प्रशासकीय सेवेमध्ये गेलेले डॉ. राधाकृष्ण पवार यांनी पेशंट वर केलेले उपचार व 108 ॲम्बुलन्स मधील व्यवस्था बघून समाधान व्यक्त केले.