जवळा (बुरंगेवाडी) गावामध्ये मुलीचा गावदेव सोहळा चक्क घोड्यावर." /> मा.आम.दिपकआबांनी नववधूचा केला विशेष सन्मान
IMG-LOGO
Home सामाजिक मा.आम.दिपकआबांनी नववधूचा केला विशेष सन्मान
सामाजिक

मा.आम.दिपकआबांनी नववधूचा केला विशेष सन्मान

June 2023 140 Views 0 Comment
IMG

जवळा (बुरंगेवाडी) गावामध्ये मुलीचा गावदेव सोहळा चक्क घोड्यावर...

 मा.आम.दिपकआबांनी नववधूचा केला विशेष सन्मान

जवळा प्रतिनिधी

समाजामध्ये स्त्रियांना समान वागणूक मिळाली पाहिजे.स्त्री पुरुष समानतेचे गोडवे आज प्रत्येक व्यक्ती काढून गायले जात आहेत परंतु प्रत्येक्षात कृती मात्र फार थोड्या व्यक्तीकडून घडली जात असते याचेच आज उदाहरण सांगोला तालुक्यातील जवळा येथील बुरांगेवाडी आज अनुभवायला मिळाली.

आज पर्यंतच्या परंपरेनुसार प्रत्येक गावामध्ये गावदेव सोहळा हा नवरदेवाचा वाजत गाजत घोड्यावरून किंवा रथा मधून केला जातो.आज पहिल्यांदाच या परंपरेला फाटा देत जवळा (बुरंगेवाडी) येथील श्री.संभाजी श्रीपती बुरंगे यांनी आपली सुकन्या चि.सौ.कां.साक्षी हिचा गावदेव सोहळा चक्क घोड्यावरून वाजत गाजत जवळा गावांमधून काढल्यामुळे समाजामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाची व नारीशक्तीच्या स्वाभिमानाची नांदी होत आहे असे दिसत आहे. जवळा (बुरंगेवाडी) येथील श्री.संभाजी श्रीपती बुरंगे यांची कन्या चि.सौ.कां.साक्षी ही आंधळगाव ता. मंगळवेढा येथील हेमंत ठेंगील यांचे चिरंजीव सुरज यांच्याशी तिचा विवाह संपन्न होणार आहे. तिचा गावदेव सोहळा आज वैशिष्ट्यपूर्णरित्या डोळ्याचे पारणे फेडणारा जवळा गावांमध्ये पार पडला. हे समजतात स्त्रियांच्या हक्कासाठी,स्त्रियांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, कायम जागृत असणारे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा नेहमीप्रमाणे आपल्या राहत्या निवासस्थानी वाड्यामध्ये जनता दरबार सुरू होता या दरम्यान या गावदेव सोहळ्याचा ताफा वाड्यासमोरून जाताना आबांना कुणीतरी ही माहिती सांगितल्यानंतर आबांनी उत्स्फूर्तपणे आपल्या राहत्या वाड्याच्या समोर त्या वधूच्या आई-वडिलांचे कौतुक करून नववधूचा स्वतः फेटा बांधून व साळुंखे पाटील कुटुंबीयांकडून औक्षण व ओटी भरून सन्मान केला. या कार्याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.