असा पण एक प्रामाणिकपणा......

शाळेत प्रवेश घेण्य" /> शाळेत प्रवेश घेण्यासाठी आले आणि पैसे कागदपत्रे गहाळ झाली.....आनंद मुळे आनंद गवसला
IMG-LOGO
Home सामाजिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी आले आणि पैसे कागदपत्रे गहाळ झाली.....आनंद मुळे आनंद गवसला
सामाजिक

शाळेत प्रवेश घेण्यासाठी आले आणि पैसे कागदपत्रे गहाळ झाली.....आनंद मुळे आनंद गवसला

June 2023 266 Views 0 Comment
IMG

असा पण एक प्रामाणिकपणा......

शाळेत प्रवेश घेण्यासाठी आले आणि पैसे कागदपत्रे गहाळ झाली.....आनंद मुळे आनंद गवसला

सांगोला प्रतिनिधी
सांगोला शहरातील मेन रोड येथे दररोज सकाळी आपल्या दिवसभराच्या कामाच्या सुरवातीस देव दर्शन करणे हे अनेकांचा नित्य नियम आहे त्या मधील एक आनंद खटकाळे रा. अकोला वासुद आपल्या दिवसाची सुरवात नेहमी प्रमाणे शनी मंदिरात जावून शनी महाराजांचे दर्शन घेवून निघाले असता समोर च एक छोटी प्लास्टिक पिशवी फडफड होती अन् त्यातून पाचशे ची नोट बाहेर डोकावत होती. कोणाचे तरी पैसे पडले असतील या भावनेने गाडी वरून उतरून पिशवी उचलली तर आत पाच हजार दोनशे दहा रुपये आणि आधारकार्ड, पॅनकार्ड शाळेचा दाखला, शाळेच्या प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे ड्रायव्हिंग लायसन्स 2 बँक चे ATM होते.त्या आधार कार्ड व इतर कागदपत्रावर बिरा भीमराव टकले असे प्राथमिक व मु पो चिंचोली असा पत्ता होता.आनंद ने चिंचोली दत्तात्रेय बेहरे यांना फोन करून प्राथमिक चौकशी केली व लगेच बीरा टकले यांचेशी संपर्क केला त्यांच्या कडून कागदपत्र व पैसे यांची खात्री करून वासुद चौकात बोलावले. थोड्या वेळाने वासुद चौकात आले असता आनंद भाऊ नी स्वतः चहा पाजून त्यांना पैसे व सगळे ओरिजनल कागदपत्र त्याच्या स्वाधीन केले. त्या वेळी बोलताना त्यांनी सांगितले पोराला शाळेत एडमिशन घ्यासाठी सांगोला येथे आलो होतो पैसे आणि कागदाची पिशवी कुठे हरवली ते कळलेच नाही. आज कागदपत्र सापडली नसती तर पोराचे एडमिशन काही होत नव्हते. बिरां टकले च्या डोळ्यात कृतज्ञता स्पष्ट जाणवत होती. जाताना मारलेली ती आनंदाची मिठी आनंद भाऊ ल कोणत्या अवॉर्ड पेक्षा कमी नव्हती वाटत. आनंद भाऊ मला बोलत होता "पैसा थोडा कमी कमावला तर चालेल पण अस काही काम केलं तर खूप समधान मिळालं लय भारी वाटलं राव..."
आपल्या एखाद्या चांगल्या कृती मुळे कोणाचे तरी नुकसान टाळले याचा मला खूप आनंद वाटतो असे आनंद खटकाले यांनी बोलताना सांगितले.