समाज भूषण -  उद्योजक श्री भाऊसाहेब रु" /> समाज भूषण - उद्योजक श्री भाऊसाहेब रुपनर
IMG-LOGO
Home सामाजिक समाज भूषण - उद्योजक श्री भाऊसाहेब रुपनर
सामाजिक

समाज भूषण - उद्योजक श्री भाऊसाहेब रुपनर

May 2023 45 Views 0 Comment
IMG

समाज भूषण -  उद्योजक श्री भाऊसाहेब रुपनर

सांगोला तालुक्यातील सुपुत्र , जेष्ठ उद्योजक व फॅबटेक एज्युकेशन
सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांचा आज १ जून रोजी वाढदिवस. त्या
निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासावर व कार्य कर्तृत्वावर टाकलेला हा
अल्पसा प्रकाश.

 

काही माणस जन्मता मोठी असतात. मोठ्या कुळात जन्म झाल्यामुळे योग्य
वातावरण निर्मिती मुळे आपोआप व सहजपणे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलत जाते.
मात्र काही व्यक्तीना परिस्थिती व वातावरणाशी झगडत व टक्कर देत पुढे जावे
लागते .ग्रामीण भागातील व्यक्तीना तर परिस्थिती बरोबर निसर्गाशी टक्कर
देत मार्गक्रमण करावे लागते.यात काही माणसे यशस्वी होतात, कर्तबगार होतात
व स्वतःच्या बुद्धी चातुर्यावर स्वतःचे करिअर घडवितात. मात्र काही
व्यक्ती यातून जात असताना स्वतः बरोबर स्वतःच्या कुटुंबाचा ,गावाचा,
तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात मोलाचे योगदान देतात.स्वतः
बरोबर गोरगरीब जनतेची व महिलांची काळजी घेतात.त्यांना शिक्षणाबरोबर
रोजगार व चरितार्थाची दालने खुली करतात .अशा व्यक्तिमत्त्वापैकी एक
असणारे म्हणजेच माननीय श्री भाऊसाहेब रुपनर . आज त्यांच्या वाढदिवसाच्या
निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा ,समाज कार्याचा व कार्य कर्तृत्वाचा
लेखाजोगा मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. एका लेखात समाविष्ट
होण्या सारखे भाऊसाहेबांचे कार्य निश्चितच नाही. त्यासाठी स्वतंत्र
पुस्तक किंवा गौरव ग्रंथ अपेक्षित आहे.भविष्यात तो होईल ही, मात्र हा
लेख म्हणजे सुईच्या छिद्रातून सूर्य पाहण्याचा प्रकार होय.

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावातील रुपनर बंधूंनी उद्योग, शिक्षण
,सहकार, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने फार मोठा
नाव लौकिक प्राप्त केला आहे. ५ भावंडा पैकी एक असणाऱ्या भाउसाहेबांनी
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत बी.एस्सी ऍग्री ही पदवी पूर्ण करुन
शासकीय सेवेस सुरुवात केली त्याच वेळेस इतर बंधू आपापल्या क्षेत्रात
योगदान देत होते. सन १९९१ साली रुपनर बंधुनी पुण्यातील भोसरी येथे फॅबटेक
उद्योगसमूहाची स्थापना केली. कालांतराने जिद्द ,कष्ट,चिकाटी व सामाजिक
दृष्टिकोन या भांडवलाच्या जीवावर रुपनर बंधुंनी अमुलाग्र क्रांती
केली.आपल्या ज्ञानाचा, विद्वत्तेचा व अनुभवाचा फायदा सांगोला सारख्या
ग्रामीण भागातील युवकाना महिलांना व विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी
त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार वाढवला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी
सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर ,आटपाडी, जत या व इतर अनेक ठिकाणी उद्योगाचा
विस्तार केला. यामध्ये फॅबटेक टेक्निकल कँपस संगोला,फॅबटेक मल्टिस्टेट
,स्पॅॉरकॉन टेक्स्टाईल व गारमेंट्स, या माध्यमातून ज्ञानदान व रोजगार
निर्मितीची सोय केली.ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या
शिक्षणाची पैशा अभावी हेळसांड होऊ नये म्हणून भाऊसाहेबांनी शासकीय
शिष्यवृत्ती बरोबर संस्थे मार्फत स्वतः आर्थिक सहाय्य देऊन विद्यार्थी
हिताला प्राधान्य दिले.शैक्षणिक योगदाना बरोबरच महिलांच्या उन्नतीसाठी
स्वतः भाऊसाहेब व रुपनर बंधूंनी स्पॅॉरकॉन उद्योग समूहामार्फत मोलाचे
योगदान दिले आहे.फॅबटेक मल्टिस्टेट सहकारी बँकेच्या माध्यमातून गरजू
व्यक्तीना अल्प व्याजदरात आर्थिक साहाय्य करण्याचे काम सुरू असल्याने
बँकेच्या २२हून अधिक शाखा अनेक ठिकाणी कार्यरत आहेत.

या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे बँकेत २५० कोटी पेक्षा अधिक ठेवी असून ५००००
पेक्षा अधिक सभासद आहेत. बँकेची आर्थिक उलाढाल ५०० कोटींपेक्षा अधिक असून
पश्चिम महाराष्ट्रातील ३०००० पेक्षा अधिक गरजू महिलांना अर्थ साहाय्य
करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ५००० पेक्षा अधिक लघू उद्योगांना
बँकेमार्फत आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे . महिला सक्षमीकरणाबाबत फॅबटेक
उद्योगसमूहाने भाऊसाहेबांच्या मार्गदर्शना खाली सुवर्णाक्षरांनी नोंद
घेण्याजोगे कार्य केले आहे.या मध्ये विशेष करून गरीब, विधवा, परितक्त्या,
अर्धशिक्षित, सुशिक्षित व उच्चशिक्षित महिलांचा समावेश असून त्या
सर्वांना खंबीर पणें स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी व समाज जीवनात
सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा देण्यात भाऊसाहेबांचे फार मोठे योगदान
आहे.फॅबटेक उद्योग समूह भरभराटीस नेण्यात तीन पिढ्यांचे परिश्रम कारणीभूत
असून नवीन पिढीतील सदस्य देखील नव्या विचाराने व नवीन तंत्रज्ञानाच्या
आधारे उद्योग समुह अग्रेसर ठेवण्यात प्रयत्नशील आहेत.त्यामुळे देशात व
विदेशात हजारो कुटुंबांना रोजगार देणारा व कुटुंब संस्था उभी करण्यात
योगदान देणारा एकमेव समूह म्हणून फॅबटेक उद्योग समूहाकडे पाहिले
जाते.फॅबटेक समूहाच्या प्रत्येक क्षेत्राला भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाचा
परीस स्पर्श लाभल्याने सर्वच क्षेत्रे अग्रेसर असून समाज जीवनात
सन्मानाने कार्यरत आहेत. त्यासाठी भाऊसाहेबांनी सन २००६ साली सुस्थितीतील
चांगल्या पदाची शासकिय नोकरी सोडून फॅबटेक उद्योग समूहाला महत्व
दिले.त्यावेळेपासूनच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात फॅबटेक समूह
रुजला,विस्तारला व समाज जीवनात लोकांच्या हृदयात स्थान मिळवून बसला आहे.

उद्योग शिक्षण सहकार या बरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील भाऊसाहेब व रूपनर
बंधूंचे फार मोठे काम आहे. कोरोना काळात केलेले कार्य, सांगली येथील पूर
ग्रस्तांना केलेली मदत, दर वर्षी १ जून ला घेतले जाणारे रक्तदान शिबिर ,
मेडशिंगी ग्रामस्थांसाठी स्वखर्चातून केलेली पाण्याची सोय, मेडशिंगी
येथील आरोग्य केंद्रासाठी दान केलेली जमीन, पाणी फौंडेशनला केलेली भरीव
आर्थिक मदत या व इतर अनेक सेवा कार्यामधून त्यांचे सामाजिक सेवेचे व्रत
अखंड सुरू आहे.

त्यांच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार प्राप्त झाले
आहेत .त्या पैकी दिल्ली येथील एस. आय. पी. एच. संस्थेने त्यांना बेस्ट
व्हिजनरी पर्सन हा पुरस्कार बहाल केला आहे .

त्याच प्रमाणे अहमद नगर येथील महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने त्यांना
महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

अशा या कर्तव्य तत्पर व्यक्तिमत्वास आजच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा.

 

 

लेखन/ शब्दांकन -: प्रा. तन्मय ठोंबरे