सौ.स्वाती मस्के यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान" /> सौ.स्वाती मस्के यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान' पुरस्कार प्रदान
IMG-LOGO
Home सामाजिक सौ.स्वाती मस्के यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान' पुरस्कार प्रदान
सामाजिक

सौ.स्वाती मस्के यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान' पुरस्कार प्रदान

May 2023 50 Views 0 Comment
IMG

सौ.स्वाती मस्के यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान' पुरस्कार प्रदान


पंढरपूर (प्रतिनिधी) महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागातर्फे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दिनांक ३१ मे रोजी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यानुसार ग्रामपंचायत गादेगाव ता.पंढरपूर कडून सौ स्वाती दिलीप मस्के यांना सरपंच सौ.वंदना बागल व उपसरपंच सौ.लता हुंडेकरी, यांचे हस्ते अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले‌. यावेळी मोहन बागल, तानाजी बागल, पद्माकर बागल, बाळासाहेब बागल , ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ व रोख रक्कम असे होते.
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट/उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला, महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असणाऱ्या,
सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग, बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींचे शिक्षण या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार असणाऱ्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो.सौ.स्वाती मस्के यांचे वरील क्षेत्रातील कार्य प्रमाण मानून हा पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. सौ. स्वाती मस्के या सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे जीवशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. दिलीप मस्के यांच्या पत्नी आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..