यशश्री अकॅडमी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..! यशश्री अकॅडमी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!
IMG-LOGO
Home शैक्षणिक यशश्री अकॅडमी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!
शैक्षणिक

यशश्री अकॅडमी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!

May 2023 510 Views 0 Comment
IMG

यशश्री अकॅडमी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!

भाळवणी येथील यशश्री अकॅडमी मधील इ 12 वी ची 100% निकालाची परंपरा कायम असून येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेस एकूण 55 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये विशेष प्रविण्य श्रेणीमध्ये एकूण 3 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये एकूण 11 विद्यार्थी व द्वितीय श्रेणी मध्ये एकूण 34 विद्यार्थी पास झालेले आहेत या मध्ये प्रथम क्रमांक चि. रोहित बाळासो उमडाळे 80.83%. द्वितीय क्रमांक कु. सानिका संतोष उमडाळे 79.33% व तृतीय क्रमांक चि.शिवराज विजय मोरे 76.17% या विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. या विद्यार्थ्यांना अकॅडमी चे संचालक श्री प्रवीण लिंगडे,रणजितसिंह लोखंडे ,अमर शिंदे,सोनाली शिंगटे,नवनाथ पांढरे, किशोर हाडमोडे,प्रदीप खिलारे,संदीप काळे,अण्णा शिंदे, रणधीर लिंगडे,संजय कस्तुरे,विठ्ठल बोचरे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भाळवणी ग्रामस्थ व पालक स्तरातून कौतुक होत आहे