विठ्ठल रुक्मिणी मातेचे चरणी आजवरचे सर्वात मोठे दान 

पं" /> विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान

IMG-LOGO
Home सामाजिक विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान
सामाजिक

विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान

January 2023 155 Views 0 Comment
IMG

विठ्ठल रुक्मिणी मातेचे चरणी आजवरचे सर्वात मोठे दान 

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूरच्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण करण्यात आले आहे. जालण्यातील एका महिला भाविकाने विठ्ठल रुक्मिणीचरणी हे दान अर्पण केले आहे. यामध्ये जवळपास पावणे दोन कोटी रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे. जालन्यातील या भाविकाने गुप्त दान म्हणून विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट, सोन्याचे विविध अलंकार, सोन्याच्या पाटल्या, मनी मंगळसूत्र आदी सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल आणि रूक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.‌ याच निमित्ताने या भाविकाने रुखवत म्हणून चांदीचे ताट,वाट्या, तांब्या, आरसा, समय, असा विविध वस्तूसह रेशमी वस्त्र ही भेट दिली आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. विठ्ठल रुक्मिणीला दान केलेल्या वस्तूंमध्ये कोणकोणत्या वस्तुचा समावेश?

                वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहनिमित्त ही भेट दिली आहे. या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत. याशिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा अशा किमती वस्तू देखील अर्पण केल्या आहेत.