सांगोला विद्यामंदिरमध्ये ७४ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजार" /> सांगोला विद्यामंदिरमध्ये ७४ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न
IMG-LOGO
Home सामाजिक सांगोला विद्यामंदिरमध्ये ७४ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न
सामाजिक

सांगोला विद्यामंदिरमध्ये ७४ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

January 2023 101 Views 0 Comment
IMG

सांगोला विद्यामंदिरमध्ये ७४ प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) ७४ भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप, शीलाकाकी झपके, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार,बिभीषण माने उपस्थित होते

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्था कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके यांचे हस्ते संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सुनील भोरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.याप्रसंगी एन.सी.सी.विभागाचे संचलन झाले.तसेच प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर वैयक्तिक व सांघिक यशस्वी खेळाडूंचा व क्रीडा विभाग नियंत्रक पर्यवेक्षक पोपट केदार,प्रशाला क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे, ज्युनिअर कॉलेज प्रमुख डी.के.पाटील, क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव, प्रा. सचिन चव्हाण, संतोष लवटे, सुभाष निंबाळकर,एन.सी.सी.विभाग मकरंद अंकलगी, उज्ज्वला कुंभार या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बहारदार देशभक्तीपर सामूहिक नृत्य सादर केले.. 

या कार्यक्रमासाठी माजी व विद्यमान प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण, सुनील भोरे,प्रा.डी.के.पाटील यांनी केले व उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे यांनी आभार मानले..

    - प्रा.धनाजी चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना माहिती देताना भारताने संसदीय लोकशाहीच्या चौकटीत साध्य केलेल्या उल्लेखनीय बाबी सांगत येणारा काळ हा नाविन्यतेचा असणार आहे हे ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पकतेला मनाची गुंतवणूक, बांधीलकी व इतरांचे सहकार्य या त्रीसूत्राची जोड देऊन प्रत्यक्ष क्षेत्रात धवल यश मिळवावे असे सांगितले व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक जागरूक नागरिक म्हणून देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये आपण समजून घ्यावीत व नागरिकांनी फक्त हक्काची मागणी करून चालणार नाही तर आपल्या कर्तव्याप्रती दक्ष राहणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. हे प्रत्येक नागरिकांच्या लक्षात येईल त्याचवेळी भारतीय प्रजासत्ताक चिरायू होणार आहे.असे विचार मांडले..