करकमच्या जागर स्वच्छता अभियान व करकंब गावच्या लेकीचं झाड टीम व" /> करकमच्या जागर स्वच्छता अभियान व करकंब गावच्या लेकीचं झाड टीम व युगंधर आखाडा वतीने तिर्थक्षेत्र पंढरपूर प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ चकाचक
IMG-LOGO
Home सामाजिक करकमच्या जागर स्वच्छता अभियान व करकंब गावच्या लेकीचं झाड टीम व युगंधर आखाडा वतीने तिर्थक्षेत्र पंढरपूर प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ चकाचक
सामाजिक

करकमच्या जागर स्वच्छता अभियान व करकंब गावच्या लेकीचं झाड टीम व युगंधर आखाडा वतीने तिर्थक्षेत्र पंढरपूर प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ चकाचक

January 2023 66 Views 0 Comment
IMG

करकमच्या जागर स्वच्छता अभियान व करकंब गावच्या लेकीचं झाड टीम व युगंधर आखाडा वतीने तिर्थक्षेत्र पंढरपूर प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ चकाचक

करकम प्रतिनिधी 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेकडून विठ्ठल मंदिर परिसर स्वच्छता अभियान मध्ये जागर स्वच्छ्ता टीमच्या ३०-३५ महिला व पुरूष स्वच्छतादुतांनी सहभाग घेतला होता.प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ चकाचक करत असताना मा.प्रणवमालक परिचारक व आळंदी देवस्थान चे श्रीधर सरनाईक यांनी करकम स्वच्छ्ता टीमला शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आज वसंत पंचमी रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न होत असतानाच सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी मातेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली होती,त्या अगोदर करकंब मधील जागर स्वच्छता अभियान टीम व युगंधर आखाडा टीमच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर नगरीतील संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग नामदेव पायरी,विणे गल्ली,कालीकादेवी चौक,काळा मारुती,चौफाळा,नाथ चौक,तांबडा मारूती,सहकार गणपती असा मार्ग जागर स्वच्छता अभियान टीम मदतीने चकाचक करण्यात आला,यावेळी स्वच्छता करत असताना अनेकांनी शुभेच्छा दिल्या पांडुरंगाचा आशिर्वाद नक्कीच तुम्हांला लाभणार, सांगितले.यावेळी युगंधर आखाडा टीमच्या वतीने ऐतिहासिक शस्त्र कला पथकाचेही संचलन चौकाचौकात होत होते ते पाहून सर्वांनी कौतुक केले, स्वच्छता पूर्ण झाल्यावर मंदिर समितीने सर्व स्वच्छतादुतानी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेवून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.खरोखरच आज सर्व जागर टीमचे सदस्य आनंदी मनाने स्वच्छता करुन कृतकृत्य झाल्याची भावना सर्वांच्या मनात होती,ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी जागर स्वच्छता अभियान टीम,लेकीच झाड टीम आणि युगंधर आखाडा टीमच्या सर्वं स्वच्छता दुतांनी अधिक परिश्रम घेतले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.