गावे समृध्द झाल्यास देशाच्या महासत्तेचा मार्ग सुकर - आमदार शहा" /> सांगोला तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
IMG-LOGO
Home सामाजिक सांगोला तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सामाजिक

सांगोला तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 2023 253 Views 0 Comment
IMG

गावे समृध्द झाल्यास देशाच्या महासत्तेचा मार्ग सुकर - आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): संपूर्ण देश आज स्वाभिमानाने आणि ताठमानाने लाडक्या तिरंगी झेंड्याला सलाम करीत आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांची निर्मिती झाली. अहिंसेच्या आणि क्रांतीच्या या दुधारी मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. राजेंद्रप्रसाद, घटना समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह घटना समितीतील सदस्यांनी संपूर्ण जगाला अशा आश्चर्यचकित करणारी घटना तयार केली. लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. देशातील प्रत्येक गावे समृध्द झाल्यास देशाच्या महासत्तेचा मार्ग सुकर होईल असे मत आमदार शहाजीबापू पाटील व्यक्त केले.

       भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजित पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त वीर मातांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देणं देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरु आहे. त्या वाटचालीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. प्रजासत्ताक गणराज्याची संकल्पना स्वीकारुन आपण लोकशाहीच्या मार्गाने उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाला वर्तमानात प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सर्व प्रयत्नशील आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.

       यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार तुषार शिंदे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, काँग्रेसचे युवक नेते अजयसिंह इंगवले, माजी उपसभापती नारायण जगताप, दत्तात्रय सावंत, आनंद घोंगडे, किशोर बनसोडे, शिवाजी बनकर, अस्मिर तांबोळी, नायब तहसीलदार किशोर बडवे, नवनाथ पवार, बाळासाहेब बनसोडे, दीपक खटकाळे, प्रताप मस्के, अच्युत फुले, शंकर काळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त नगरपालिका, पोलीस स्टेशन, महावितरण, कृषी विभाग, वनविभाग, तलाठी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, बाजार समितीसह शाळा, महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.