IMG-LOGO
Home सामाजिक सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली
सामाजिक

सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली

December 2022 71 Views 0 Comment
IMG

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी जालना जिल्ह्यातील परतूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मुलींना स्वसंरक्षणासाठी ऑपरेशन दुर्गा, ज्येष्ठांसाठी ३ टक्के निधीची तरतूद, हर घर तिरंगा, वृक्ष बँक, ई-बाईक कट्टा, कचऱ्यापासून खतनिर्मिती यासह विविध उपक्रम शहरात राबवून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगोल्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

      सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कैलास केंद्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरात विविध उपक्रम राबविले. मुलींना स्वसंरक्षणासाठी राबविलेल्या ऑपरेशन दुर्गा उपकरणाची राज्याने नोंद घेतली आहे. ज्येष्ठांसाठी ३ टक्के निधीची तरतूद, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बचत गटांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी अर्थपुरवठा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, हर घर तिरंगा तिरंगा, ई-बाईक रॅली, माझी वसुंधरा अभियान, सौर ऊर्जेच्या जनजागृतीसाठी ई-सोलर ट्री, शोषखड्डे, वृक्षारोपण, हरित सांगोलासाठी वृक्ष बँक, ई-बाईक कट्टा, कचऱ्यापासून खतनिर्मिती, पर्यावरण जनजागृती करण्यासाठी सांगोला नगरपरिषद इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, सांगोला नगरपरिषदेचा पाणी पुनर्वापर प्रकल्प, दिव्यांगाना अर्थसहाय्य, जलप्रदूषण रोखण्यासाठी सांगोला नगरपरिषदेचा निर्माल्य ते निसर्ग उपक्रम असे अनेक उपक्रम राबवून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगोल्याची विशेष ओळख निर्माण केली आहे. सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी जालना जिल्ह्यातील परतूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.