पुणे येथे डॉक्टर बी.यु.देवकते जीवन गौरव पुरस्काराने" /> पुणे येथे डॉक्टर बी.यु.देवकते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
IMG-LOGO
Home सामाजिक पुणे येथे डॉक्टर बी.यु.देवकते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
सामाजिक

पुणे येथे डॉक्टर बी.यु.देवकते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

December 2022 243 Views 0 Comment
IMG

पुणे येथे डॉक्टर बी.यु.देवकते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 

  सांगोला प्रतिनिधी

           सांगोला तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ दंतरोग तज्ञ डॉक्टर भगवान उमाजी देवकते यांचा धनगर डेंटल असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे यावर्षी जीवनगौरव पुरस्कार देऊन पुणे येथे सन्मान करण्यात आला.मानपत्र,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील दंतरोग क्षेत्रात सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्‍याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ डॉक्टरांना हा पुरस्कार दिला जातो. गेली 42 वर्ष सांगोला, आटपाडी, माळशिरस, मंगळवेढा,पंढरपूर व आसपासच्या तालुक्यांमधून येणाऱ्या रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टर देवकते यांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला.

           यावेळी डॉ विद्या पवार यांनी प्रस्तावना केली.डॉ रुक्मिणी धायगुडे यांनी डॉ देवकते यांचा जीवनपट उलगडून सांगत असताना त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरीही अपरिमित कष्ट, प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी यशाची शिखरे गाठली आणि आज ते प्रत्येक नवोदित दंतरोग तज्ञांचे आदर्श आहेत असे नमूद केले. डॉक्टर देवकते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या विद्यार्थी दशेतील तसेच एक दंत रोग तज्ञ म्हणून काम करताना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांविषयी सांगितले. कामाशी एकनिष्ठ आणि समर्पण वृत्ती ठेवल्यास यश नक्कीच मिळते असा कानमंत्र त्यांनी सर्वांना दिला.  या सोहळ्या वेळी दंतरोग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सर्व देवकते कुटुंबीय तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले दंतरोग तज्ञ उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे आयोजक - डॉ नागेश डोलारे,डॉ विकास बेंदगुडे, डॉ विजय मेहेत्रे,डॉ दिलीप मगदूम,डॉ रामदास हजारे, डॉ पांडुरंग श्रीरामे,डॉ प्रथमेश बुदे, डॉ स्वप्निल चोपडे,डॉ ललित धायगुड़े.