सांगोला तालुक्यामध्ये झिरो तलाठ्याचा सुळसुळाट...?

सांगोला तालुक्यामध्ये झिरो तलाठ्याचा सुळसुळाट...
IMG-LOGO
Home सामाजिक सांगोला तालुक्यामध्ये झिरो तलाठ्याचा सुळसुळाट...
सामाजिक

सांगोला तालुक्यामध्ये झिरो तलाठ्याचा सुळसुळाट...

November 2022 155 Views 0 Comment
IMG

सांगोला तालुक्यामध्ये झिरो तलाठ्याचा सुळसुळाट...?

तलाठी कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरुच?

सांगोला वार्ताहर

सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावांमध्ये तलाठी कार्यालयात अधिकारी म्हणून मिरविणाऱ्या झिरो (खासगी कर्मचारी) तलाठयांचा सुळसुळाट झाला आहे. सध्या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे शासनाकडून काहीतरी मदत मिळणार असल्याने नागरिकांची तलाठी कार्यालयात गर्दी सुरू आहे असुन यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकाराबद्दल महसूल विभाग खरोखर अनभिज्ञ आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात झिरो तलाठी व खासगी उमेदवारांची नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच तहसीलदाराने कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. सांगोला ग्रामीण भागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात कामकाजाच्या मदतीसाठी झिरो तलाठी व खासगी उमेदवारांच्या नेमणुका केल्या आहेत. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सुचविलेलीच सातबारा उतारे व दाखले ही कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. तलाठी व मंडळ अधिकान्यांनी शासकीय दप्तर खासगी माणसाच्या ताब्यात देणे गैर असताना कार्यालयातील पूर्ण दप्तरच त्यांच्या ताब्यात देण्याचे धाडस केल्याने झिरो तलाठी कारभारी झाले असल्याचे दिसून येत आहे त्याचा फटका तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना बसला असल्याची अनेक उदाहरणे घडली असून, भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराची तहसीलदारांनी वेळीच दखल घेऊन झिरो तलाठी व खासगी उमेदवारांची नेमणूक करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना समज द्यावी अशी मागणी होत आहे.