चेतनसिंह केदार-सावंतांची कार्यतत्परता, जखमी वारकऱ्यांना मिळा" /> चेतनसिंह केदार-सावंतांची कार्यतत्परता, जखमी वारकऱ्यांना मिळाले जीवदान....
IMG-LOGO
Home सामाजिक चेतनसिंह केदार-सावंतांची कार्यतत्परता, जखमी वारकऱ्यांना मिळाले जीवदान....
सामाजिक

चेतनसिंह केदार-सावंतांची कार्यतत्परता, जखमी वारकऱ्यांना मिळाले जीवदान....

November 2022 51 Views 0 Comment
IMG

चेतनसिंह केदार-सावंतांची कार्यतत्परता, जखमी वारकऱ्यांना मिळाले जीवदान....

 

सांगोला प्रतिनिधी

सोमवार ३१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जुनोनी गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झालाअसून यात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून पाच गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत हे कार्यकर्त्यांसह तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आले. त्यांनी जखमींची व नातेवाईकांची विचारपूस करून जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर तसेच मुंबईत असलेले आमदार शहाजीबापू पाटील, आमदार समाधान आवताडे यांच्याशी चेतनसिंह केदार-सावंत यांनी फोनवरून संपर्क साधत अपघाताची माहिती दिली. दर १० ते १५ मिनिटाला चेतनसिंह केदार-सावंत हे प्रत्येक घडामोडींची अपडेट वरिष्ठांना देत होते. जखमींवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजित पाटील आले. त्यावेळी केदार यांनी त्यांना घडलेल्या अपघाताची माहिती देत अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करावे लागेल असे सांगितले. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी डॉक्टरांसोबत चर्चा करून गंभीर असलेल्या रुग्णांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच चेतनसिंह केदार-सावंत हे अपघातात मयत झालेल्या व जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या, नातेवाईकांच्या सतत संपर्कात होते. मयतांचे नातेवाईक रुग्णालयात आल्यावर मृतदेह रुग्णवाहिकेतून घेवून जाण्यासाठी चेतनसिंह केदार- सावंत यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी यांनी मोलाची मदत केली. त्याचवेळी चेतनसिंह केदार- सावंत हे नातेवाईकांना धीर देखील देत होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार समाधान आवताडे यांच्या संपर्कात राहून येथील परिस्थितीची माहिती देत होते. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातल्याने वातावरण सुन्न झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना, नातेवाईकांना धीर देत चेतनसिंह केदार-सावंत यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यास कार्यतत्परता दाखवल्याने त्यांना जीवदान मिळाले....