सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात
सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात
IMG-LOGO
Home आरोग्य सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात
आरोग्य

सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात

January 2021 297 Views 0 Comment
IMG

सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात

 
 
 
सांगोला प्रतिनिधी
कोरोणा संक्रमण रोखण्याच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आज सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरुवात झाली. सांगोला तालुक्यातील ऑनलाईन पोर्टलवर नोंद असलेल्या 1268 डॉक्टर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना यांना प्राधान्य देत लसीकरणाची सुरवात झाली.यापैकी 1119 शासकीय आरोग्य कर्मचारी व 149 खाजगी आरोग्य कर्मचारी आहेत.त्यापैकी 634 जणांना सुरवातीच्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. एका दिवसात जास्तीत जास्त शंभर जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर पासून ते अंगणवाडी सेविका पर्यंत सर्वांनी कोरोना काळात पुढे होऊन लढा दिला.त्यामुळे कोरोना ची लस देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोरोना लसीकरण टप्पा आज सांगोल तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम फुले,आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी निमाचे अध्यक्ष डॉ. शिवराज भोसले डॉ. संदीप देवकते डॉ. एच व्ही गावडे डॉ. महेश राऊत डॉ वैभव जांगळे, अरुण कोळी निशिकांत पापळकर नवले तात्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Copyright © All rights are reserved | Developed by stancecode.com