प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ' राज्यस्तरीय उत्कृष" /> प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ' राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार ' जाहीर
IMG-LOGO
Home सामाजिक प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ' राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार ' जाहीर
सामाजिक

प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ' राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार ' जाहीर

May 2026 10 Views 0 Comment
IMG

प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ' राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार ' जाहीर

 

पुणे : के. एस. आय. पब्लिकेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा मानाचा 'लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील मराठीचे प्राध्यापक डॉ. रामचंद्र यादव यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिरात रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या भव्य संमेलन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शाल ,श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन निमंत्रितांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.                               

या साहित्य संमेलनाचे उदघाटन मा. डॉ. मधुकर हुजरे ( धाराशिव ) हे करणार आहेत. प्रा. डॉ. रामचंद्र यादव हे मराठीचे व्यासंगी अभ्यासक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. 'ज्ञानेश्वरीच्या मराठी अनुवादांचा अभ्यास' या विषयावर संशोधन करून त्यांनी १०७२ पृष्ठांचा बृहद स्वरूपाचा प्रबंध लिहिला आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी.ही पदवी देऊन सन्मानित केले. एम. ए., एम्. फिल. , पीएच. डी. अशी उच्चस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता संपादन करून हयातभर त्यांनी जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई ( जिल्हा-सातारा ) येथे मराठी भाषेच्या व साहित्याच्या अध्यापनाचेच कार्य केले. तर हे नित्याचे काम करत-करतच अधूनमधून त्यांनी कविता, कथा , ललित निबंध इत्यादी प्रकारचे साहित्य लेखनही केले. त्यांचा 'आराधना' हा काव्यसंग्रह यापूर्वीच प्रसिद्ध झालेला असून प्रस्तुत साहित्य संमेलनातच त्यांच्या 'सर्वसाक्षी' या दुसऱ्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद मा. मातृभक्त आचार्य शंकर घनश्यामदास अंदानी ( पुणे ) हे भूषविणार आहेत. या संमेलनासाठी राज्यभरातील अनेक मराठी साहित्यिक , संशोधक, अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. असे संमेलनाचे कार्यकारी अधिकारी व स्वागताध्यक्ष मा. कवी सरकार श्री. विलास पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.