सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्" /> सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जागरूक नागरिकांनी केला निषेध..
IMG-LOGO
Home सामाजिक सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जागरूक नागरिकांनी केला निषेध..
सामाजिक

सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जागरूक नागरिकांनी केला निषेध..

October 2025 150 Views 0 Comment
IMG

सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जागरूक नागरिकांनी केला निषेध..

सांगोला प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण आर.गवई साहेब यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगोला व शहर परिसरातील जागरूक नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला. या संदर्भात बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसीलदार संतोष कणसे यांना शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले. या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय हे अधिकार दिलेले आहेत. त्या न्यायाचे रक्षण करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच सर्वोच्च न्यायालय व त्या संस्थेचे न्यायमूर्ती हे त्या खुर्चीवर बसत असताना कोणत्याही एका समाजाचे प्रतिनिधित्व करत नसून ते संविधानाचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळे भारताच्या नागरिकांनी संविधानाचा आदर केला पाहिजेत असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अॅड अक्षय बनसोडे यांनी केले.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक अॅड शंकर सरगर अॅड आयुब पटेल ,डॉ.वैभव जांगळे तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी व उपस्थित नागरिकांनी स्वातंत्र्य ,समता, बंधुता ,एकात्मता देणाऱ्या संविधानाशी नाते जोडा हा संदेश देत सरन्यायाधीश भूषण गवळी साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.